वसई : मच्छिामारी करीत असताना समुद्रात बुडालेल्या मृत मच्छिमाराच्या वारसांना सरकारकडून दिली जाणारी एक लाख रुपयांची तात्काळ मदत तब्बल २७ महिन्यांनी मंजूर झाली असून अद्याप ती वारसांपर्यंत पोचलेली नाही. दुसरीकडे, विमा योजनेची मदतीपासूनही वारस वंचित आहेत.सदस्य जयवंत वामन पाटील मच्छिामारीसाठी खोल समुद्रात गेले असताना ५ मार्च २०१४ रोजी बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्याचा मृतदेह १० मार्च २०१४ रोजी अर्नाळा समुद्रकिनारी आढळून आला होता. पाटील त्यांच कुटुंबातील एकमेव कमावते होते. सरकारच्या योजनेनुसार नियमाप्रमाणे आर्थिक मदत मिळावी यासाठी संस्थेच्या शिफारशीसह प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे कारण पुढे करीत मत्स्यवसाय खात्याने मदत रोखून धरली होती. त्यानंतर काँग्रेसचे वसई शहर अध्यक्ष माकल फुर्ट्याडो यांनी सदरची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तब्बल २७ महिन्यांनी पाटील यांच्या वारसांना एक लाख रुपांची मदत मंजूर करण्यात आली. याशिवाय मच्छिामार विमा योजने अंतर्गत आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती फुर्ट्याडो यांनी दिली. (प्रतिनिधी)
मच्छीमारांच्या वारसांना २७ महिन्यांनी मदत मंजूर
By admin | Published: July 15, 2016 1:22 AM