ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आॅनलाइनमुळे सर्वच उमेदवार, पक्ष जेरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:54 AM2017-09-28T00:54:49+5:302017-09-28T00:55:08+5:30

जिल्ह्यातील चार तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १६ आॅक्टोबर पासून होणार असल्याने उमेदवार शोधण्यात राजकीय पक्षाची धावपळ सुरू असतांना शोधलेल्या उमेदवारांची आॅनलाइन माहिती भरतांना सर्वच उमेदवार आणि राजकीय पक्ष जेरीस आले आहेत.

All candidates, party jerseys due to online elections for Gram Panchayats | ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आॅनलाइनमुळे सर्वच उमेदवार, पक्ष जेरीस

ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आॅनलाइनमुळे सर्वच उमेदवार, पक्ष जेरीस

Next

- हितेंन नाईक ।

पालघर : जिल्ह्यातील चार तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १६ आॅक्टोबर पासून होणार असल्याने उमेदवार शोधण्यात राजकीय पक्षाची धावपळ सुरू असतांना शोधलेल्या उमेदवारांची आॅनलाइन माहिती भरतांना सर्वच उमेदवार आणि राजकीय पक्ष जेरीस आले आहेत.
अनेक समस्या उद्भवत असून आयोगाची वेबसाईट ही मध्येच बंद पडत असल्याने अर्ज भरण्याची मुदत दोन दिवस वाढवून देण्याची मागणी बहुजन विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी निवडणूक आयोगा कडे केली आहे.
१४ सप्टेंबर पासून तहसीलदारांनी निवडणुकांची नोटीस प्रसिद्ध केल्यापासून राजकीय पक्ष कामाला लागले असून उमेदवार शोधणे, त्यांची कागदपत्रे गोळा करणे, नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी एकच धावपळ उडाली आहे. आॅनलाइन उमेदवारी अर्ज राज्यनिवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर भरून देण्याची अंतिम तारीख २९ सप्टेंबर असून त्यांची वेबसाईट अत्यंत धीम्या गतीने चालत असून मध्येच बंद पडत असल्याने फॉर्म मध्ये भरलेली माहिती डिलिट होत असल्याने नव्याने भरावी लागत आहे. पूर्वी उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्ववभूमी, स्थावर-जंगम मालमत्ता, व्यवसाय, कर्जे इथपर्यंत मोजकीच माहिती फॉर्म मध्ये लिहून सादर केली जात होती.
मात्र ग्रामीण भागातील उमेदवार शोधल्या नंतर वरील सर्व माहिती गोळा करताना उमेदवारासह राजकीय पक्षाला मोठ्या दिव्यातून जावे लागत असून उमेदवार वेळेवर नकार देत असल्याने आमच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण होत असल्याचे पंचायत समितीचे उपसभापती मेघन पाटील ह्यांनी सांगितले.

माहिती मिळविता मिळविता सगळयांच्या नाकी आले नऊ
उमेदवारा विरूध्द कोर्ट केस आहे काय? कोर्टाचे नाव, केस नंबर, कलम, चार्जशीट, न्यायालयाने दोषी ठरविल्यास त्याची सर्व इत्यंभूत माहिती, उमेदवार व त्यांच्या पत्नीच्या नावावरील वाहन संख्या, नंबर, खरेदी करतानाची किंमत, खरेदी वर्ष, दागिने त्याचे वजन, किंमत, विमा पॉलिसी रक्कम, इतर येणी असल्याची माहिती,कर्ज तपशील, एकूण मुलांची संख्या, जन्मतारीख,उत्पन्नाची माहिती, पती-पत्नीचे पॅनकार्ड, इन्कमटेक्स भरत असल्यास त्याची माहिती, एकूण वार्षिक उत्पन्नाची माहिती, यापूर्वी कोणती निवडणूक लढली, असल्यास त्यावेळी फॉर्म मध्ये भरलेल्या संपत्तीचे मूल्य, बँकेत नव्याने खाते उघडणे, शैक्षणिक तपशिलात शिक्षण,शाळा-महाविद्यालयाचे नाव, विद्यापीठ नाव, टक्केवारी, स्थावर-जंगम मालमत्ता विवरण मध्ये पती-पत्नीच्या नावावरची शेतजमीन, बिनशेती जमीन, घर, सदनिका, गाळे, दुकाने, संपत्ती स्वत: घेतली की विडलोपार्जित, संपत्ती असल्यास गाव, सर्व्हे नंबर, क्षेत्र, बाजारभावा नुसार किंमत अश्या नानाविध प्रश्नांची माहिती गोळा करणे आण िती व्यविस्थत आॅनलाइन भरणे अशा किचकट प्रक्रियेतून सध्या राजकीय पक्ष्यांच्या लोकांना जावे लागत आहे.

Web Title: All candidates, party jerseys due to online elections for Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.