मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्त पदी आयपीएस सदानंद दाते यांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 11:47 PM2020-09-02T23:47:27+5:302020-09-02T23:48:54+5:30
केंद्रीय न्याय विभागात दाते हे सहसचिव म्हणून गेली पाच वर्षे कार्यरत होते. फेब्रुवारी 2020 मध्ये मुदत संपल्यानंतर ते तातडीने दिल्लीहून परतले.
वसई - मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत काही महिन्यांपूर्वी राज्यात उत्सुकता लागून राहिली असताना, केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची ‘घरवापसी’ झाली मात्र त्यावेळी केंद्रातून आलेले व प्रतिनयुतीवरून आणि अजूनही प्रतिक्षेत असलेल्या दातेवर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करून एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. बुधवारी तसे गृहविभागाने त्यांच्या नियुक्ती चे आदेश पारित केले.
अधिक माहितीनुसार, केंद्रीय न्याय विभागात दाते हे सहसचिव म्हणून गेली पाच वर्षे कार्यरत होते. फेब्रुवारी 2020 मध्ये मुदत संपल्यानंतर ते तातडीने दिल्लीहून परतले. फेब्रुवारी पासून त्यांना सरकारने सक्तीच्या प्रतीक्षेत (कम्पल्सरी वेटिंग) राहावयास ठेवले होते. मूळचे पुण्याचे असलेले सदानंद दाते हे 1990 च्या आयपीएस तुकडीतील डेशिंग अधिकारी आहेत. मुंबई गुन्हा अन्वेषण शाखेत सहआयुक्त म्हणून काम पाहात असताना, त्यांची 25 फेब्रुवारी, 2015 रोजी दिल्लीला न्याय विभागात प्रतिनियुक्ती झाली.
मार्चअखेरपर्यंत नियुक्तीची शक्यता होती पण ?
आयपीएस सदानंद दाते हे मितभाषी, प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी सी बी आयसह, मुंबई क्राइम ब्रॅँच, फोर्स वन मधील जबाबदारी सक्षमपणे सांभाळली आहे.त्यांच्या या नियुक्ती ने सध्या तरी मागील बरीच वर्षे लाल फितीत व मुख्यालय कुठे होणार या वादग्रस्त चर्चेत अडकलेल्या या आयुक्तपदाचा वाद अखेर या नियुक्तीमुळे तुर्तास तरी निवळला असे मानू या