शहरं
Join us  
Trending Stories
1
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
2
शेकडोंचा जमाव, घोषणाबाजी, दगड-विटांचा मारा, बांगलादेशात तीन मंदिरांची तोडफोड
3
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
5
स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार न बनणं हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय; शरद पवारांची टीका
6
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
7
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
8
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...
9
Kalki Koechlin : "मी पैशासाठी अनेक गोष्टी..."; २ वर्षे काम नाही; वडापाव खाऊन अभिनेत्रीने काढले दिवस
10
"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय
11
अरे बापरे! "कशाला लाज वाटायची?" म्हणत २४ वर्षीय मुलीने ५० वर्षांच्या वडिलांशी केलं लग्न
12
किंग कोहली अन् रुटपेक्षाही फास्टर ठरला Kane Williamson; जाणून घ्या त्याचा खास रेकॉर्ड
13
"आमच्याकडे हिंदू सुरक्षित, भारतातच अल्पसंख्यांकावर..."; बांगलादेशने प्रत्युत्तर देताना लावले आरोप
14
इथे शिव्या देण्यास मनाई आहे! महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीने केला अनोखा ठराव, दंडही ठरवला!
15
विराट कोहलीच्या आवडत्या कंपनीची कमाल, एका झटक्यात कमावले ८३८ कोटी रुपये
16
मुख्यमंत्रि‍पदाची चर्चा रंगली, भाजप धक्कातंत्र वापरणार?; मोहोळांनी स्वत: खुलासा करत संपवला सस्पेन्स 
17
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
18
'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदेनं लग्नात हिंदीमध्ये घेतला हटके उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
December Born Astro: डिसेंबरमधले लोक असतात आळशी, हट्टी, तरी व्यक्तिमत्त्वाची छाप पाडण्यात होतात यशस्वी!
20
INDU19 vs PAKU19 : भारताविरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात टॉस जिंकून पाक संघानं घेतली बॅटिंग

अर्नाळा किल्ला, सातपाटीला भरतीचा तडाखा

By admin | Published: July 05, 2016 2:49 AM

दुपारी समुद्रात आलेल्या उधाणाच्या जोरदार लाटांनी अर्नाळा किल्ल्यातील समुद्रकिनारी असलेल्या २० झोपड्या वाहून गेल्या . तर गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून लोकांचे

विरार : दुपारी समुद्रात आलेल्या उधाणाच्या जोरदार लाटांनी अर्नाळा किल्ल्यातील समुद्रकिनारी असलेल्या २० झोपड्या वाहून गेल्या . तर गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून लोकांचे मोठे नुकसान झाले.चारी बाजूने पाण्याने वेढलेल्या अर्नाळा किल्ला गावात गेल तीन वर्षात आलेले आजचे तिसरे मोठे उधाण होते. यावेळी उसळलेल्या मोठ्या लाटांनी समुद्रकिनारी असलेल्या २० झोपड्या वाहून गेल्या. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. याआधी तीन वेळा असेच उधाण आले होते. त्यावेळीही किनाऱ्यालगतच्या झोपडय वाहून गेल्या होत्या. गावाला चारीबाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. दरवर्षी उधाण आले की समुद्राचे पाणी गावात शिरते. यासाठी बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी गेल्या तीन वर्षांपासून केली जात आहे. मात्र, मेरीटाईम बोर्डाने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. आजचे उधाण मोठे होते. त्यामुळे अनेकांच्या घराचे नुकसान झाले. गरीबाच्या झोपड्या वाहून गेल्या. तीन वर्षातील ही तिसरी घटना. पण, मागणी करूनही गावकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही, असे सरपंच भारती वैती यांनी सांगितले. घरांची हानी किनाऱ्यावर हाहाकारपालघर: उधाणामुळे ४ जून पासून सातपाटी किनाऱ्यावरील अनेक घरामध्ये समुद्राचे पाणी शिरून त्याचे संसार उध्वस्त झाल्यानंतर अनेक लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने फोल ठरल्यामुळे संतापलेल्या महिलांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांना साकडे घातले.समुद्राला १९ दिवस मोठे उधाण येणार असून त्यामध्ये ४ ते ७ जुलै असे ४ दिवस , २२ जुलै ते २४ जुलै असे ३ दिवस, २ ते ४ आॅगस्ट असे ३ दिवस व १९ ते २२ आॅगस्ट असे सलग ४ दिवस समुद्राच्या पाण्याला मोठे उधाण येणार होते. सातपाटीचा बंधारा फुटल्याने ४ जून पासूनच किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरायला सुरूवात झाली होती. ते शिरू नये म्हणून प्लॅस्टिकच्या गोण्यांमध्ये माती भरून मच्छिमारांनी आपल्या घरासामोर संरक्षीत भिंत उभारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ४.७२ मिटर उंचीच्या लाटांच्या तडाख्यापुढे ती टिकली नाही. लाटा संरक्षक बंधारा ओलांडून थेट किनाऱ्या लगतच्या घरांना धडका देत होत्या. त्यामुळे दांडापाडा, क्रांतीमंडळ, भाटपाडा, इ. भागातील घरामध्ये पाणी शिरून त्यांच्या जीवन उपयोगी साहित्याची नासाडी झाली. बंधाऱ्याच्या दुरूस्तीचा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात पडून असल्याने जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी जिल्हा नियोजनच्या निधीमधून आपत्कालीन निधी तात्काळ मंजूर करावा अशी मागणी माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, मनिषा निमकर प्रशांत पाटील, आमदार अमित घोडा, उत्तम पिंपळे, इ. नी केली होती. परंतु कोणत्या तरतूदीमधून तात्काळ निधी देता येईल यासंदर्भात आज मी अधिकाऱ्यांशी चर्चा करतो असे जिल्हाधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले. परंतु आज नंतर उद्या ५ जुलै, ६ जुलै व ७ जुलै रोजी सतत चार दिवस समुद्राचे उधाण वाढत जाणार असल्याने व बंधाऱ्याचे झिजलेले दगड लाटे सोबत उडून घराजवळ पडत असल्याने प्राणहानीची शक्यताही वाढली आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी ग्रा.पं. ला घेराव घातला व आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यायची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार सर्व महिलांनी जिल्हाधिकाऱ्याची भेट घेतली.