पालघर जिल्हयातील बार, हॉटेल्सना नोटीसा
By admin | Published: March 26, 2017 04:15 AM2017-03-26T04:15:39+5:302017-03-26T04:15:39+5:30
सर्वाच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालघर जिल्हयातील महामार्गापासून ५०० मीटर अंतरातील बार आणि हॉटेल्सना
वसई : सर्वाच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालघर जिल्हयातील महामार्गापासून ५०० मीटर अंतरातील बार आणि हॉटेल्सना १ एप्रिलपासून मद्यविक्री करण्याच्या नोटीसा राज्य उत्पादक शुल्क विभागाने बजावल्या.
यात बार, वाईन शॉप, देशी मद्यविक्रीची दुकाने यांचा समावेश असून त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरणही केले जाणार नाही.
पालघर जिल्हयाती तीनशेहून अधिक परवाने रद्द होणार आहेत. वरसोवा पूल ते तलासरीपर्यंत महामार्गालगत किमान पंच्याहत्तर बार आहेत.
तर किमान शंभरच्या घरात वसई तालुक्यात बार आहेत. अर्नाळा ते विरार फाटा, अर्नाळा ते वसई गाव, वसई गाव ते वसई स्टेशन, वसई स्टेशन ते हायवे, नालासोपारा ते हायवे आदी रस्ते राज्य महामार्गात गणले जातात.
नेमक्या याच मार्गावर वसईत सर्वाधिक बार आहेत. त्याचबरोबर वरसोवा पूल ते खानिवडे या वसई तालुक्यातील हायवेवरही बार आहेत. त्यांना मोठा फटका बसणार आहे. मात्र जनतेत चर्चा अशी आहे की, या बार आणि दुकानांमधील अधिकृत मद्यविक्री थांबली
तरी काळ्या बाजारात होणारी मद्यविक्री सुरूच राहील. उलट तिला उधाणच येईल. विविध शासकीय यंत्रणांना या रुपाने मलिदा खाण्याचीही संधी लाभेल. तर दुसरीकडे सरकारी महसूल घटणार आहे. (वार्ताहर)