शिकाऊच्या भरोशावर ५२ गावे, कुडूस प्रा.आ. केंद्र वैद्यकीय अधिका-याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 03:03 AM2017-09-20T03:03:50+5:302017-09-20T03:03:54+5:30

On the basis of the learner 52 villages, Kudus Pvt. Waiting for the Center Medical Officer | शिकाऊच्या भरोशावर ५२ गावे, कुडूस प्रा.आ. केंद्र वैद्यकीय अधिका-याच्या प्रतीक्षेत

शिकाऊच्या भरोशावर ५२ गावे, कुडूस प्रा.आ. केंद्र वैद्यकीय अधिका-याच्या प्रतीक्षेत

Next

वाडा : तालुक्यातील कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिका-याविना शिकाऊ डॉक्टरांच्या आधारे सुरू असल्याने येथील रूग्णांना महागड्या खाजगी रूग्णालयात उपचार घ्यावे लागतात. या केंद्रात गेल्या वर्षभर मागणी करूनही वैद्यकीय अधिकारी दिला जात नाही. यामुळे येथील नागरिक नाराज आहेत.
या प्राथमिक आरोग्य केंद्रावर कुडस पंचक्रोशीतील ५२ गावपाड्यांतील रुग्ण अवलंबुन आहेत. हा भाग बहुल आदिवासी वस्तीचा असल्याने रूग्णांना महागड्या खाजगी रूग्णालयात उपचार घेणे परवडत नाही. या केंद्राच्या कक्षेत नऊ उपकेंद्र असून प्राथमिक आरोग्य तपासणी नंतर येथील रूग्ण कुडूस केंद्रात उपचारासाठी येतात. कुडूस येथे एमबीबीएस व बीएएमएस अशा दोन वैद्यकीय अधिकाºयांच्या जागा गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत. या नियुक्ती बाबत तालुका व जिल्हा परिषद अधिकºयांकडे मागणी निवेदन देवूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे.
येथे सद्या कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी या अकरा महिन्याच्या करारावर असून त्या शिकाऊ बीएएमएस पदवीधारक आहेत. पत्रव्यवहार व जबाबदारीच्या कामात त्यांना तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भस्मे यांची मदत घ्यावी लागते. कुडूस येथे रोज २०० रूग्ण उपचारासाठी येतात. शिवाय येथे दोन चार डिलीव्हरी केसेस असतात. या सर्वांना २४ तास उपचार देताना कुमारी डॉ.मिनल पाटील यांची दमछाक होते.
अलिकडे खुपरी येथील परिचारिका वैशाली पाटील या त्यांच्या मदतीला आहेत. जुलै २०१६ पासून येथे कार्यरत असलेले डॉ. भस्मे यांना निंबवली येथे नियुक्ती दिल्याने कुडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्टरच नाही. येथे हिवतापाच्या रूग्णाबाबत फिरती तपासणी होत नसल्याची तक्र ार नागरिकांकडून केली जात आहे. हिवतापाचे डॉक्टर कोण अशी जाहिरात देण्याची वेळ रूग्णावर आली आहे. येथे स्वतंत्र मलेरिया तज्ज्ञांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे. परिचारिका एक पद भरण्याची मागणी आहे. दोन वैद्यकीय अधिकारी, एक मलेरिया डॉक्टर, एक परिचारिका अशी पदे त्वरीत भरण्याची मागणी आहे.
फोटो : १८ वाडा कुडूस आरोग्य केंद्र
>टाळे लावू श्रमजीवीचा इशारा
कुडूस येथील पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती धनश्री चौधरी, पंचायत समिती सदस्या मेघना पाटील, पंचायत समिती उपसभापती जगन्नाथ पाटील व अन्य पदाधिकारी असूनही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नाहीत.
या बाबत नागरिकात चर्चा आहे. लवकरात लवकर वैद्यकीय अधिकारी दिले नाहीत तर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे लावण्याचा इशारा श्रिमजवी संघटना, स्वाभिमान संघटना यांच्याकडून देण्यात आला आहे.

Web Title: On the basis of the learner 52 villages, Kudus Pvt. Waiting for the Center Medical Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.