काळ्या फिती लावून निषेध; वसई-विरार महापालिका कर्मचारी एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:09 PM2018-12-14T23:09:10+5:302018-12-14T23:09:53+5:30
दमदाटीविरोधात पोलिसात केली तक्रार
वसई : वसई विरार महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार होणारी दमदाटी, हल्ले, शिवीगाळ, अरेरावीची भाषा या विरोधात महापालिकेच्या कर्मचाºयांनी गुरूवारी काळ्या फिती लावून आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी त्रास देणाºया लोकांविरु द्ध कारवाई करण्याची मागणी विरार पोलिसाकडे केली. आंदोलकांनी कार्यालयाच्या आवारात येऊन या दादागिरी विरोधात घोषणाबाजी केली.
वसई विरार महानगरपालिका कर्मचारी आणि अधिकाºयांना गेल्या काही महिन्यांपासून कार्यालयीन कामकाजात व्यत्यय आणून नाहक त्रास दिला जात आहे. हे प्रकार सातत्याने वाढल्याने महापालिका अधिकारी आणि कर्मचाºयांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी गुरूवारी काळ्या फिती लावून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने सर्व प्रभागातील कर्मचारी व अधिकारी वर्ग या आंदोलनात सहभागी झाले होते.
महापालिकेच्या क्षेत्रात पहिल्यांदाच असा प्रकार झाल्याचे दिसून आले आहे. इतर वेळेस नागरीक महानगरपालिकेविरोधात विविध मागण्यासाठी आंदोलन करीत असतात परंतु महापालिका अधिकाºयांनी देखील गुरूवारी सकाळ पासून काळ्या फिती हाताला बांधून निषेध व्यक्त करत मुख्यालयासमोर आंदोलन केले. शनिवारी ‘एच’ प्रभागात कारवाईचे काम करताना प्रभागाचे सहाय्यक आयुक्त व सहाय्यक अभियंता यांना तीन ते चार तास जमावाने घेरून ठेवले होते. तसेच शिवीगाळ करून आयुक्तांना देखील संपवून टाकण्याची भाषा काही लोकांनी केली असल्याने अशा घटना वारंवार घडू लागल्याने हे आंदोलन करण्यात आले होते.
कर्मचाऱ्यांवरची आपबिती...
२ फेब्रुवारी २०१८रोजी राजावली वाघाराल पाडा या ठिकाणी चाळीचे अतिक्र मणा विरोधात कारवाई साठी गेलेल्या पथकावर मोठ्या जमावाकडून जीवघेणा हल्ला झाला. दोन व चारचाकी वाहने व दोन जेसीबी पेटवून दिल्या होत्या.
२५ एप्रिल २०१८ रोजी प्रभाग समिती ‘आय’च्या कार्यक्षेत्रात पालिकेच्या कर्मचाºयाला अमानुषपणे मारहाण केली होती.
२३ मे २०१८ रोजी मध्ये प्रभाग ‘डी’च्या कार्यक्षेत्रात बेकायदा जाहिरात फलक याच्यावर कारवाईसाठी गेले असता धक्काबुकी करण्यात आली होती.
८ डिसेंबर २०१८ रोजी प्रभाग समिती ‘एच’ मध्ये कारवाईसाठी गेलेल्या सहाय्यक आयुक्त व सहाय्यक अभियंता यांना शिवीगाळ करण्यात आली होती.
अरेरावीची भाषा, शिवीगाळ, मारहाण हे प्रकार वाढू लागल्याने सर्व अधिकारी व कर्मचारी मिळून काळ्या फिती बांधून अशा गुंड लोकांचा निषेध करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.
- रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त
महानगरपालिकेच्या अधिकाºयांनी आमच्याकडे शिवीगाळ व अरेरावीची भाषा करणारे तसेच पालिकेच्या कर्मचाºयांना कारवाईसाठी गेल्यानंतर मारहाण करणार आहेत, त्यांच्याविरु द्ध कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.या घटनेची सविस्तर चौकशी होऊन कारवाई करण्यात येईल.
-जयंत बजबळे,
उपविभागीय पोलीस अधिकारी
लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सदैव प्रशासनाच्या पाठीशी आहोत. महानगरपालिकेचे कर्मचारी शासनाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्याबाबत असे प्रकार घडत असतील तर ते निंदनीय आहे.
- सुदेश चौधरी,
स्थायी समिती सभापती