बनावट परवानगीच्या आधारे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 11:40 PM2017-11-06T23:40:03+5:302017-11-06T23:40:14+5:30

वसई विरार महापालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांसह दहा बिल्डरांनी नालासोपाºयात बनावट विकास परवानगीच्या आधारे बेकायदा बांधकाम करून लोकांची

Construction based on counterfeit permissions | बनावट परवानगीच्या आधारे बांधकाम

बनावट परवानगीच्या आधारे बांधकाम

Next

वसई : वसई विरार महापालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांसह दहा बिल्डरांनी नालासोपाºयात बनावट विकास परवानगीच्या आधारे बेकायदा बांधकाम करून लोकांची फसवणूक केली असल्याने त्यांच्यावर मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
निळेमोरे येथील सर्व्हे क्रमांक १६४-ब या मिळकतीवर दिनांक २ जून २०१० रोजी तत्कालीन सिडको प्रशासनाकडून देण्यात आलेल्या बांधकाम परवानगी मध्ये फेरफार करून बनावट बांधकाम परवानगीच्या आधारे ५२ सदनिका व २२ गाळे अशा इमारतींची दुय्यम निबंधकांकडे नोंदणी करून सामान्य नागरीक व वित्तिय संस्थांची फसवणुक केल्याची तक्रार शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांनी केली आहे.
याप्रकरणी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केल्यावर नगररचना विभागाने बांधकाम परवानगी (बीपी/३९७९) या नस्तीची तपासणी केली असता सदरची बांधकाम परवानगीची प्रत ही मूळ नस्तीमधील नसल्याचे आढळून आले. त्यामुळे सदरची बांधकाम परवानगीची प्रत बनावट असल्याने नगरसेवक अतुल साळुंखे यांच्यासह
विकासक अनिल गुप्ता, प्रदीप गुप्ता, देवेंद्र लधानी, विनोद पाटील,
राजेश किणी, अखिलेश चौबे, मुकेश सोनार, अरविंद सिंह, धर्मेश गांधी यांच्यावर बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Construction based on counterfeit permissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.