Coronavirus : कोरोनाचा शेतकऱ्यांना फटका, टोमॅटोला कवडीमोलाचा भाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 12:59 PM2020-04-14T12:59:35+5:302020-04-14T16:16:17+5:30
Coronavirus : लाॅकडाऊनमुळे मार्केट बंद झाल्याने दर्ज्जेदार पिक येवूनही माल विक्रीसाठी बाजारात जात नसल्याने ही टोमॅटो शेतात सडू लागले आहेत.
वाडा - वाडा तालुक्यात या वषी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटोची शेती केली असून त्यात उत्पन्न ही भरपूर आले आहे. मात्र लाॅकडाऊनमुळे मार्केट बंद झाल्याने दर्ज्जेदार पिक येवूनही माल विक्रीसाठी बाजारात जात नसल्याने ही टोमॅटो शेतात सडू लागले आहेत. टोमॅटो शेती करण्यासाठी सेवासहकारी सोसायट्यांकडून रब्बी पिकासाठी घेतलेले कर्ज फेडणार कसे या चिंतेने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
तालुक्यातील देवघर ,बुधावली, गुंज,काटी, सारसी, या गावातील सुमारे १०० शेतकऱ्यांनी ८०० एकर शेतजमीनीत टोमॅटोची शेती केली असून त्यात पीकही चांगल्याप्रकारे आले आहे. जेव्हा केव्हा नवी मुंबई येथील वाशी मार्केर्ट चालू असेल तेव्हाच फक्त दोन ते तीन व्यापारी येथे टोमॅटो खरेदीसाठी येतात ते पण सर्वच शेतकऱ्यांचा माल उचलत नाहीत. ज्या शेतकऱ्यांचा टोमॅटो घेतात तोपण काटीमोल भावाने एक नंबरचा टोमॅटो 3 रूपये किलो दराने तर दोन नंबरचा टोमॅटो 2 रूपये दराने व तीन नंबरचा टोमॅटो फेकून दिला जातो. त्यामुळे अशा मातीमोल दराने विक्री झाली आणि बाकीचे टोमॅटो शेतातच सडू लागली आहेत. त्यामुळे टोमॅटो शेतीचा यशस्वी पयोग करूनही आजच्या घडीला शेतकरी अडचणीत सापडत आहे.
वाड्यातील शेतकऱ्यांना भातपीकाला पर्याय म्हणून टोमॅटोची उत्तम प्रकारे शेती केली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून टोमॅटो उत्पादनात गेल्या अनेक वर्षांपासून आपला लौकीक कायम राखला आहे. मात्र या वर्षीही उत्पादन चांगले आले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे उत्पादन अडचणीत सापडले आहे. त्यामुळे टोमॅटोची खरेदी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून व्हावी अशी मागणी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या राज्यात कोरोनाचे संकट ओढावल्याने सर्वत्र ताळेबंदी सुरू आहे. त्यामुळे शेतात पिकलेला टोमॅटो विकला जात नसल्याने तो शेतातच सडू लागला आहे. त्यामुळे टोमॅटो शेतीसाठी घेतलेले सोसायटीचे रब्बी कर्ज फेडणार कसे या चिंतेत येथील शेतकरी सापडला आहे. त्याला सावरण्यासाठी सरकारची मदत मिळावी अन्यथा यातून बाहेर पडणे कठीण.
- किशोर पाटील
टोमॅटो उत्पादक शेतकरी-देवघर
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोना आता लपू शकणार नाही, 'हे' सॉफ्टवेअर फक्त काही सेकंदात शोधणार, वैज्ञानिकाचा दावा
Coronavirus : लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन जेवण मागवणं पडलं महागात, बसला तब्बल 50 हजारांचा फटका
Coronavirus : भाषणाआधी पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट, म्हणाले...
Coronavirus : 'देशाला स्मार्ट उपायांची गरज', राहुल गांधींचा मोदींना सल्ला