Coronavirus : वसईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, कोरोनाचे आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 02:54 PM2020-04-13T14:54:28+5:302020-04-13T14:57:42+5:30
Coronavirus : तरुणाच्या मृत्यूनंतर पालिकेने खबरदारी घेत तात्काळ उपाययोजना म्हणून या रुगांच्या संपर्कांत आलेल्या संशयित अशा 17 जणांना नालासोपाऱ्याच्या खासगी रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.
वसई-विरार शहर मनपाच्या पापडी भागात दोन दिवसांपूर्वी एका 28 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मुंबईच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला होता. मात्र आता याच मृत्यू झा्लेयाल तरुणाच्या कटुंबातील सदस्यांपैकी एका 54 वर्षीय पुरुषाला व 32 वर्षीय महिलेला सोमवारी कोरोनाची लागण झाली असून या दोघांवर नालासोपाऱ्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या वतीने लोकमतला देण्यात आली आहे.
दरम्यान पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 10 एप्रिल रोजी वसईच्या पापडी भागातील एक 28 वर्षीय तरुण हा मुंबईत कर्करोगावर उपचार घेत असताना रुग्णालयाने त्याची कोरोना चाचणी घेतली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला होता. मात्र याच तरुणाचा दुसऱ्या दिवशी मुंबईत मृत्यू झाला. या तरुणाच्या मृत्यूनंतर पालिकेने खबरदारी घेत तात्काळ उपाययोजना म्हणून या रुगांच्या संपर्कांत आलेल्या संशयित अशा 17 जणांना नालासोपाऱ्याच्या खासगी रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.
कोरोना चाचणी तिथे या सर्वांची करण्यात आली असता या कोरोना तपासणीत एकूण 17 संशयित रुग्णापैकी केवळ दोन रुग्णांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या दोघांमध्ये एक पुरुष व एक महिला यांचा समावेश असून अन्य 15 निगेटिव्ह आलेल्या रुग्णासहित या सर्वांवर नालासोपाऱ्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : बापरे! ...म्हणून त्याने मित्राला सुटकेसमध्ये भरून घरी आणलं, पण...
Coronavirus : ...अन् आईच्या अंत्यसंस्कारासाठी जवानाने केला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास
Coronavirus : Google ची बातच न्यारी; आजचं Doodle लय भारी, जाणून घ्या खासियत