CoronaVirus News: धोका वाढला; मुंबईजवळच्या आणखी एका शहरानं १० हजार कोरोना रुग्णांचा टप्पा ओलांडला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:53 PM2020-07-20T22:53:05+5:302020-07-20T22:53:31+5:30
CoronaVirus News: आज १९० कोरोना रुग्णांची नोंद; १२० जण कोरोनामुक्त
वसई -विरार शहरात सोमवारी अखेर बाधित एकूण रुग्णाचा आकडा 10 हजार 17 वर गेला आहे. तर विरार नालासोपारा शहरात 3 रुग्णाचा मृत्यू झाला असून दिवसभरात 190 बाधित रुग्ण आढळून आले तर 120 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
सोमवारी वसई- विरार महापालिका हद्दीत 190 कोरोना बाधित रूग्ण आढळून आले, तर नालासोपारा -2 व विरार शहरात 1 असे मिळून एकूण 3 रुग्णाचा मृत्य झाल्याने आजपर्यंत पालिका हद्दीत एकूण 192 रूग्ण मयत झाले आहेत. तसेच पालिका हद्दीत आजवर एकूण बाधित रुग्णांची संख्या आता 128 दिवसांनंतर एकूण 10 हजार 17 वर पोहोचली आहे. त्यासोबत शहरात एकूण 3244 रूग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये वसई - 79 नायगाव - 2, वसई-विरार- 8 नालासोपारा- 54 आणि विरार-47 तसेच यात एकूण 109 पुरुष व 81 महिला रुग्णाचा अंतर्भाव आहे.
दिलासा कमी, पण आजही 120 रूग्ण झाले कोरोनामुक्त
वसई विरार शहरात पुन्हा 120 रूग्ण पालिका हद्दीतील विविध रुग्णालयातून घरी परतल्याने ही बाब कमी दिलासादायक ठरली आहे. मात्र कोणते रुग्ण कुठल्या रुग्णालय व परिसरातून मुक्त करण्यात आले याची माहिती पालिकेकडून उपलब्ध झालेली नाही तरीही आजवर मुक्त रुग्णाची एकूण संख्या 6581 वर पोहचली आहे.