Coronavirus : आर्थिक मंदीतून सावरणारी पायपीट...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 03:23 PM2020-04-13T15:23:25+5:302020-04-13T15:30:01+5:30
Coronavirus : वाशीचे एपीएमसी मार्केट बंद असल्याने भाजीपाला, धान्य व विविध मालाची शहरात होणारी आवक घटली आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरं लॉकडाऊन झाली आहेत. त्यामुळे शहरातील सर्वच व्यवसाय उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. त्यामुळे मोठी आर्थिक मंदीची लाट येणार असल्याची प्रत्येकालाच जाणीव झाली आहे. त्यामुळे या मंदीतून सावरण्यासाठी काही भाजी विक्रेते मैलोन मैल पायपीट करताना रस्त्यावर दिसून येत आहेत. यामध्ये भाजी विक्रेते मंदीतून सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत.
रस्त्यावर पूर्णच शुकशुकाट...त्यात कडाक्याचं पडलेले ऊन... उन्हापासून बचावासाठी कुठलेच डोक्यावर संरक्षण नाही...हाती पाण्याची बॉटल ही नाही...निव्वळ भाजीपाला लादलेली हाती सायकल हाकत नालासोपारा पूर्वेतील असंख्य छोटे भाजी विक्रेते राजोडी ते अर्नाळा भागातून पायपीट करत आहेत. विशेष म्हणजे वाशीचे एपीएमसी मार्केट बंद असल्याने भाजीपाला, धान्य व विविध मालाची शहरात होणारी आवक घटली आहे. त्यामुळे असंख्य विक्रेत्यांना संध्या वसई, नालासोपारा व विरार मधील गावपट्ट्या तून भाजी खरेदी करावी लागत आहे. त्यातच शहरात अत्यावश्यक सोडून खासगी वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील मंडईत भाजीचं पोहोचत नाही आहे. त्यामुळे भाजी विक्रीसाठी माल कुठून आणावा असा प्रश्न अनेक विक्रेत्यांना पडला होता.
Coronavirus : ...अन् आईच्या अंत्यसंस्कारासाठी जवानाने केला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटर प्रवासhttps://t.co/KG2jYioFVF#coronaupdatesindia#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 13, 2020
दरम्यान या प्रश्नांवर मात करण्यासाठी भाजी विक्रेत्यांनी सायकल हाती धरत अर्नाळा, राजोडी परिसर गाठायला सुरुवात केली आहे. रोज दुपारनंतर हे भाजी विक्रेते चार-पाच सायकलीसह अर्नाळा परिसरात जातात. तेथील स्थानिक शेतकऱ्याकडून भाजी खरेदी करून ती सायकलवर लादून आपले घर गाठतात. त्यानंतर या भाज्या आपआपल्या परिसरात विकतात. त्यांतून काही पैसे हाती लागल्यावर आपली गुजराण करत आहेत.
विशेष म्हणजे या भाजी विक्रेत्यांना आर्थिक मंदी सतावत आहे. या मंदीतून कसे सावरायचे अशा विचारात ते गुरफटले आहेतं. तज्ज्ञांच्या मते 2009 पेक्षा जास्त भयानक अशी आर्थिक मंदीची लाट येईल. त्यामुळे ते अशाप्रकारे भर दुपारच्या उन्हात भली मोठी पायपीट करून भाजी विक्रीद्वा रे सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा प्रयत्न नक्की त्यांना मंदीतून सावरण्यास काही अंश मदत ठरेल अशी अपेक्षा बाळगून ते आहेत.
Coronavirus : बापरे! ...म्हणून त्याने मित्राला सुटकेसमध्ये भरून घरी आणलं, पण...https://t.co/I9GCCehH6N#coronavirus#CoronaLockdown
— Lokmat (@MiLOKMAT) April 13, 2020
भाजी विकता येत नसल्याने मंदीची चिंता सतावते होती. त्यामुळे या मंदीतून सावरण्यासाठी आम्ही राजोडी वरून माल आणून विकत आहोत. यामधून थोड फार तरी सावरता येईल.
आत्माराम गुप्ता, भाजी विक्रेता
घरची आर्थिक घडी सोडवण्यासाठी आम्ही घराबाहेर पडलो आहे. असे किती दिवस विना धंद्याचे काढता येणार आहेत. त्यामुळे आम्ही इतक्या लांबून माल आणून विकत आहोत.
राकेश यादव, भाजी विक्रेता
Coronavirus : Google ची बातच न्यारी; आजचं Doodle लय भारी, जाणून घ्या खासियतhttps://t.co/hfnymyc8nL#coronavirus#GoogleDoodle
— Lokmat (@MiLOKMAT) April 13, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : बापरे! ...म्हणून त्याने मित्राला सुटकेसमध्ये भरून घरी आणलं, पण...
Coronavirus : ...अन् आईच्या अंत्यसंस्कारासाठी जवानाने केला तब्बल तीन दिवस 1100 किलोमीटरचा प्रवास
Coronavirus : Google ची बातच न्यारी; आजचं Doodle लय भारी, जाणून घ्या खासियत