गंडविणारी महिला अटकेत
By admin | Published: July 24, 2016 04:00 AM2016-07-24T04:00:09+5:302016-07-24T04:00:09+5:30
मोदी स्कीमच्या नावाखाली नालासोपाऱ्यातील ५० महिलांची आर्थिक फसवणूक केलप्रकरणी सविना युसुफ खान या महिलेला तुळींज पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्हाखाली अटक केली आहे.
विरार : मोदी स्कीमच्या नावाखाली नालासोपाऱ्यातील ५० महिलांची आर्थिक फसवणूक केलप्रकरणी सविना युसुफ खान या महिलेला तुळींज पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्हाखाली अटक केली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील नगिनदास पाडा येथील कोणार्क कॉम्प्लॅक्समध्ये राहणाऱ्या सविनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी स्कीमच्या नावाखाली ५० महिलांची फसवणूक केली आहे. नरेंद्र मोदी सरकारने ‘मोदी स्कीम’ चालू केली असून त्यात पैसे गुंतवल्यास लाखो रुपयाचा फायदा होणार असल्याच्या भूलथापा मारून फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे.
चाळीस हजार भरले तर दोन महिन्यात दहा लाख, पंधरा हजार भरले तर दोन महिन्यात पाच लाख आणि पाच हजार भरले तर दोन महिन्यात एक लाख मिळतील अशा भुलथापा सविना देत होती. त्यामुळे अनेक महिलांनी सविनाकडे पैसे गुंतवले आहेत. दोन महिन्याचा कालावधी संपून आठ ते नऊ महिने झाले तरी पैसे मिळत नसल्यामुळे संतापलेल्या महिलांनी चौकशी केली तर अशी कोणतीही स्कीम नसल्याचे समोर आले. त्यानंतर फसवणूक झालेल्या महिलांनी तुळींज पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
सविना खान घरगुती इमिटेशन ज्वेलरीचे काम करते. यानिमित्ताने संपर्कात येणाऱ्या महिलांना मोदी स्किमची माहिती देऊन त्यांना आपल्या जाळ्यात अडकवत होती. कमी पैशात अवघ्या दोन महिन्यात लाखो रुपये मिळत असल्याने परिसरातील पन्नासच्या वर महिलांनी सविनाकडे पाच, दहा, आणि चाळीस हजाराची रक्कम गुंतविली आहे.