शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
7
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
8
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
9
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
10
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
11
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
12
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
13
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
14
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
15
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
16
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
17
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
18
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
19
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
20
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

डहाणूतील रस्त्यांचा श्वास कोंडला

By admin | Published: February 08, 2016 2:22 AM

डहाणू नगरपरिषद क्षेत्रात वाढती अतिक्रमणे आणि बेशिस्त पार्र्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असून त्यावर उपाय करण्याची गरज असताना पोलीस तसेच नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत

डहाणू : डहाणू नगरपरिषद क्षेत्रात वाढती अतिक्रमणे आणि बेशिस्त पार्र्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा उडत असून त्यावर उपाय करण्याची गरज असताना पोलीस तसेच नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत. डहाणू फोर्ट रोड, थर्मलपावर, इराणी रोड, सागरनाका रोड या परिसरात सतत होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे अपघात घडण्याची शक्यता असून विद्यार्थी, वृद्ध, महिलांना जीव मुठीत घेऊनच रस्ता ओलांडावा लागत असल्याने सर्वसामान्य जनतेत संताप व्यक्त केला जात आहे.डहाणू रेल्वे स्थानकाच्या परिसरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने पर्र्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढती रहदारी, रस्त्यांवरील फेरीवाले, अरुंद रस्ते त्यातच सकाळच्या सुमारास मुंबई गुजरातकडे जाणारे कामगार आपले टु-व्हीलर रस्त्यावरच पार्र्किंग करून दिवसभर जात असल्याने या परिसराचा श्वास गुदमरतो आहे. यामुळे सतत अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही वाहनचालक तर डहाणू रेल्वे स्थानकाच्या येण्याजाण्याचा मार्गावरच वाहने उभी करून इकडे-तिकडे भटकत असतात. परिणामी मुंबई, गुजरात बाजूने एखादी ट्रेन आली की धावपळीत अनेक प्रवासी खाली पडून जखमी देखील झाले आहेत. याबाबत अनेकवेळा रेल्वे पोलिसांना तक्रार केली जाते. परंतु आरपीएफचे जवान एक-दोन दिवस कारवाई करण्याचा देखावा करून याबाबींकडे दुर्लक्ष करीत असतात.दरम्यान या परिसरात वाढत्या अतिक्रमणांचा विळखा आवळत चालला आहे. संध्याकाळच्या सुमारास तर थर्मल रोड, तसेच इराणी रोड वर चायनीज, वडापाव, हातगाडीचालक, फळ, फूल, भाजी, विक्रेते तसेच किरकोळ साहित्य विक्रेते ठिय्या देत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा ठप्प होत असते.