शौकत शेखडहाणू : येथील नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये होत असून त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु असून निवडणूकीच्या तोंडावर भाजपाला गटबाजीला सामोरे जावे लागत आहे. भाजपामधून नगराध्यक्ष पक्षाचे तिकिट मिळविण्यासाठी तीन गट पडले आहेत. पहिला भरत राजपूत यांचा पहिला गट, राष्टÑवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये आलेले माजी नगराध्यक्ष मिहिर शाह, रविंद्र फाटक यांचा दुसरा गट तर भाजपामध्ये सुरुवाती पासून असलेले डॉ. अमित नाहर यांचा तीसरा गट आहे.तिन्ही उमेदवार नगराध्यक्ष तिकिटासाठी जोर बैठका मारत आहेत. दरम्यान, या तिन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांना अपयश आले आहे तर गेल्या दोन महिन्यापासून गटबाजी करणाºया या गटांना पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा यांनाही हे गट एकत्र आणता आले नाहीत. परिणामी भाजपच्या कार्यकर्त्यांत पक्षश्रेष्ठी बद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.आगामी डिसेंबर २०१७ मध्ये डहाणू नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणू होत आहे. त्यासाठी नुकतीच प्रभाग रचना जाहिर झाली असून नगराध्यक्ष पदासासठी खूल्या वर्गातील उमेदवारांचा मार्ग मोकळा झाल्याने गेल्या दोन महिन्यापासून येथील राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस आय, शिवसेना, माकप, बहुजन विकास आघाडी, अपक्ष तसेच भाजपाने मोर्चेबांधणी सुरू करून गुप्त बैठकां बरोबरच प्रचार सुरू केला आहे. नगरपालिकेवर सध्या राष्टÑवादी काँग्रेसची सत्ता असून या नगरपरिषदेवर कोणत्याही परिस्थितीत भगवा फडकवण्यासाठी पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.आगे बढोच्या घोषणांमुळे नेत्यांची पंचाईत : सोमवारी पालकमंत्री डहाणूच्या विश्रामगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पालघर दौºयाचे नियोजन करण्यासाठी आले होते. यावेळी खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, जि.प. अध्यक्ष विजय खरपडे इत्यादी नेते उपस्थित होते. यावेळी भरत राजपूत आगे बढो, तर दुसºया बाजूला अमित नाहर आगे बढो असे जाहिर शक्ती प्रदर्शन सुरू झाले होते. या घोषणाबाजीमुळे त्यावेळी भाजपनेते चांगलेच भांबावले होते. एकूण डहाणू भाजपात गटबाजीचा राजकीय संघर्ष गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे. परंतु या तिन्ही गटाला एकत्र आणण्यात पालकमंत्री, खासदार, आमदार यांना अपयश आल्याचे दिसून येते.
डहाणू भाजपातील तीन गटांच्या तीन त-हांनी नेते झाले हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:29 AM