पालघर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी पालघर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून कोळगाव येथे सिडकोमार्फत उभारण्यात येणा-या पालघर जिल्हा मुख्यालयाचे भूमिपूजन सकाळी ११ वाजता त्यांच्या हस्ते होणार आहेभूमिपूजनाच्या कार्यक्र मास मुख्यमंत्र्यांसह अध्यक्षपद आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा हे भूषवणार असून प्रमुख अतिथी म्हणून महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील , ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, हे असणार आहेत.तर विशेष अतिथी म्हणून ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे,गृह व वित्त नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर,महसूल राज्यमंत्री संजय राठोड, तर प्रमुख उपस्थिती जिप अध्यक्ष विजय खरपडे,खासदार चिंतामण वनगा,खा.कपिल पाटील व सर्व आमदार राहणार आहेत.पालघर-बोईसर रस्ता जवळील कोळगाव येथे मुख्यालयाच्या इमारती वसविण्यात येणार असून या भागातील शासकीय जमिनीतील क्षेत्राचे एकूण सात भागात वर्गीकरण केले आहे. त्यातील एक नंबरच्या भागात (पॉकेट्स) जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस अधिक्षक व प्रशासकीय कार्यालय अ व ब अशा इमारती १०३.५७.९० हेक्टर जमिनीवर ह्या चार विभागाच्या इमारती वसणार आहेत.
जिल्हा मुख्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:27 AM