हुसेन मेमन, जव्हारतालुक्यातील नेहमीप्रमाणे गाजलेल्या दाभेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रशासनाकडून रूग्णांच्या जिवाशी खेळ्याचे काम करत असल्याचे भयाहव वृत्त हाती आले आहे. दोभेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांची तपासणी चक्क इ. ८ वी पास सफाई कामागाराकडून होत आहे. त्यातल्या त्यात हा सफाई कामगार रूग्णांना औषधेही देतो आणि इन्जेशक्शनची वेळ आली की ते ही देतो, तसेच औषधे एक्सपायर झालेली आहेत की नाही हे त्याला ठाऊक नसते, परंतू तरीही आलेल्या रूग्णांना हा औषधे देत आहे. या भयावह घटनेमुळे आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडेले आहे. दाभेरी आरोग्य केंद्राचा सफाई कामगार अमृत गवते यांच्या म्हणण्यानुसार गेल्या ३ वर्षापासून नियमित डॉक्टरच नाहीत, त्यामुळे मीच येथील रूग्णांना तपासुन औषधे देत आहे, तसेच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कधी कधी इन्जेक्शन सुध्दा मी देतो, तसेच औषधांची मुदत बाबतीत विचारणा केली असता, मुदतीतील औषधे किवा मुदत बाहेरील औषधे कुठली हे मला माहीत नाही असे सांगितले. याचाच अर्थ दाभेरी व आजुबाजूच्या पाड्यातील शेकडो रूग्णांनांच्या जीवशी हा खेळ आरोग्य विभागाकडून सुरु आहे. जव्हार तालुक्यात कुपोषणचा गंभीर मुद्दा संपत नाहीत तर आरोग्य विभागाचे दुसरे भयानक वास्तव बघायला मिळत आहे. रूग्ण सेवा हिच ईश्वर सेवा हे ब्रिद वाक्य आता फक्त बोलण्याइतकेच राहीलेले आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार येथे कुठलेच वाहन नाही, त्यामुळे आम्हा गरीब आदिवासी जनतेला पदरमोड करून ८० कि.मी. असलेले सेलवास किंवा ४० कि.मी. असलेले जव्हार येथे उपाचार करण्यासाठी जावे लागत आहे. परंतू जे इतके गरीब आहेत की, त्यांना भाड्याला पैसे नाहीत, ते रूग्ण सफाई कामागाराकडूनपन उपचार घेण्यास तयार होतात, याबाबत आम्ही पुढाऱ्यांकडे डॉक्टरांची मागणी केली होती, रस्त्याची मागणी केली होती, मात्र अद्याप कुठल्याही पुढाऱ्याने अथवा शासकिय अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष दिलेले नाही, शासनाच्या या हलगर्जी पणामुळे गरीब आदिवासी जनतेच्या जिवाशी खेळ केल्यामुळे दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)
जव्हारमध्ये सफाई कामगारच देतो औषध अन इंजेक्शन
By admin | Published: January 19, 2016 2:00 AM