पालघरात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी टिपेला

By Admin | Published: February 8, 2016 02:25 AM2016-02-08T02:25:19+5:302016-02-08T02:25:19+5:30

पालघर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या प्रचारासाठी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सेनेच्या प्रचारासाठी पालघरमध्ये सभा घेणार आहेत

The election campaign rally in Palghar | पालघरात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी टिपेला

पालघरात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी टिपेला

googlenewsNext

पालघर : पालघर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या प्रचारासाठी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सेनेच्या प्रचारासाठी पालघरमध्ये सभा घेणार आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात पालघरमधील राजकीय वातावरण भलतेच तापणार असल्याचे चिन्हे आहेत.
केंद्रात व राज्यात भाजपा-सेनेने सत्ताग्रहण केल्यानंतर वर्षभराच्या कालावधीमध्ये महागाईने मोठी उसळी घेतली व सर्वसामान्यांचे जीवनमान ढासळले. अच्छे दिनचे आमिष दाखवून निवडून आलेल्या या सरकारने मतदारांचा भ्रमनिरास केल्याने बिहारसह राज्यातील महानगरपालिका, स्वायत्त संस्थांच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपा-सेनेच्या उमेदवारांना धूळ चारून काँगेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जिंकून दिले. त्यामुळे राजकीय बदलाचा सत्ताधाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. संपूर्ण राज्याचे पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे लक्ष लागून राहील्याने वाढवण बदंर उभाारणीबाबत भाजपा-सेनेच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला रोष थोपविण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री फडणवीसांना पालघरमध्ये पाचारण करण्यात आलेले आहे. पालघरमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक वागणुक मिळत नसल्याने व राज्यातही भाजपा व सेनेच्या मंत्र्यांमध्ये तू तू - मै मै होत असल्याने ताणल्या गेलेल्या या संबंधामध्ये सामंजस्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी बजावावी, असा मानस सेनेचे पदाधिकारी बाळगून आहेत. सेना-भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पालघर-डहाणू तालुक्यातील किनारपट्टीवरच वाढवण बंदर उभारण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस यांनी करून एप्रिल महिन्यात निविदाही काढणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड संताप आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस व बविआने आमचा वाढवण बंदराला विरोध आहे, असे सांगून आपण नागरीकांसोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री वाढवण बंदराबाबत काय घोषणा करतात याकडे लक्ष लागले आहे. पोलीस उपअधिक्षक यशोद, उपविभागीय पोलीस अधिकारी बजबळे आदींनी सुरक्षेची पाहणी केली.

Web Title: The election campaign rally in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.