शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

रेतीमाफियांविरोधात एल्गार !

By admin | Published: July 14, 2016 1:35 AM

किल्लाबंदर-पाचूबंदर समुद्रात होत असलेल्या रेती उत्खननावर कडक कारवाई झाली नाही तर गावकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा कोळी युवा शक्तीने दिला आहे

वसई : किल्लाबंदर-पाचूबंदर समुद्रात होत असलेल्या रेती उत्खननावर कडक कारवाई झाली नाही तर गावकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा कोळी युवा शक्तीने दिला आहे. ही संघटना गेल्या दहा वर्षांपासून रेती उत्खननाविरोधात लढत असून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून तिने बंदी हुकुमही आणला होता. मात्र त्यानंतरही रेती उत्खनन सुरुच असल्याने गावकरी रस्त्यावर उतरणार आहेत.किल्लाबंदर-पाचूबंदर येथील किनाऱ्यावर होत असलेल्या अनधिकृत रेती उत्खननाविरोधात मागील एक दशकापासून कोळी युवा शक्तीचा लढा सुरू आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, मेरी टाईम बोर्ड तसेच पर्यावरण विभागाला वांरवार पत्रव्यहाराव्दारे सूचित केल्या नंतरही येथील किनाऱ्याची होत असलेली धूप लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालयाने जून २००६ मध्ये रेती उत्खनन करण्यास बंदी घातली होती. तरीही उत्खनन सुरूच राहिल्याने येथील कोळी समाजाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने दि. १७ जून २०१० रोजी भार्इंदर पुलाच्या पश्चिमेस अनधिकृत रेती उत्खनन करण्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिला. मात्र आजही या ठिकाणी उच्च न्यायालयाचा आदेश झुगारून सुमारे ५० च्यावर पडाव दररोज दिवस-रात्र रेती उत्खनन करीत आहेत. यामुळे संपूर्ण किनाऱ्याची वाताहत झाली असून अनेक घरे समुद्राने गिळंकृत केली आहेत. गेल्यावर्षी खोल समुद्रात ओएनजीसी या कंपनीने तेल संशोधन सुरू केल्यामुळे मागील एक वर्षांपासून मासेमारीचा धंदा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यातच याठिकाणच्या किनाऱ्यावर मत्स्य प्रजननाच्या काळातही दिवस-रात्र होत असलेल्या रेती उत्खननामुळे खाडीत पूर्वी मिळणाऱ्या बोय, कोळंबी, खेकडे तसेच इतर मत्स्यप्रजातींची संख्या झपाट्याने कमी होत आहे. तसेच सुरुंच्या बागेतील झाडे जमिनीची धूप झाल्याने वाहून जात आहेत. शिवाय रेती उत्खनन करणाऱ्या अनेक पडावावर रजिस्टे्रशन क्रमांकच नाही आणि ही बाब सागरी सुरक्षेच्यादृष्टीने अतिशय गंभीर आहे. मात्र याबाबत वसईच्या तहसीलदाराना प्रत्यक्ष भेटून व निवेदनाव्दारे कळवूनही कारवाई करण्यास जाणूनबुजून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. याबाबत गेल्याच आठवड्यात संघटनेच्या शिष्टमंडळाने संघटनेचे कार्याध्यक्ष मिल्टन सौदीया यांच्या नेतृत्वाखाली सुनिल दरपाळकर, प्रेम जान, नितीन बाठ्या, जोनास खांडळ्या, संजय मानकर यांनी वसईचे तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांची भेट असता एक धक्कादाक बाब उघडकीस आली. पाचूबंदर किनाऱ्यावर होत असलेल्या रेती उपसाबाबत विविध वर्तमानपत्रात फोटोसहित बऱ्याच वेळा बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. मात्र वसई तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी जाधव यांनी पाचूबंदर किनाऱ्यावर रेती उपसाच होत नसल्याचा अजब अहवाल दिला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कोळी युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांना चांगलेच धारेवर धरले व प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता या ठिकाणच्या किनाऱ्याची वाट लावणाऱ्या वाळू माफियावर तातडीने कारवाई न केल्यास कोळी युवा शक्तीच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर समस्त कोळी बांधव धडक मोर्चा नेतील, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष दिलीप माठक यांनी दिला आहे.