२१ वर्षांच्या सेवेनंतरही ते सावत्रच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:18 PM2019-06-14T23:18:39+5:302019-06-14T23:19:03+5:30
तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेच्या कार्यकाळात मायकल लोपीस व शिवाजी सातपुते १९९८ पासून प्रमूख अग्निशामक पदावर
नालासोपारा : तत्कालीन नगरपरिषद ते आत्ताच्या वसई-विरार शहर महानगरपालिकेमध्ये सेवा बजावणाऱ्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना २१ वर्ष सेवा बजावूनही पालिकेने सेवेत कायम न केल्याने आजही त्यांच्यातील अनेकांवर ठेका पद्धतीवर सेवा बजावत आहेत.
येवढ्या वर्षांमध्ये अनेकदा अवघड प्रसंगांत या कर्मचाºयांनी जीवाची बाजी लावून सेवा बजावली आहे, असे असताना महापालिकेला त्यांना सेवेत कायम करण्यासाठी इतका विचार का करावा लागतो? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेच्या कार्यकाळात मायकल लोपीस व शिवाजी सातपुते १९९८ पासून प्रमूख अग्निशामक पदावर मे.शिवम एंटरप्रायझेस, २००९ पासून ते २०१८ मे. श्रीराम एंटरप्रायझेस या महापालिकेच्या मंजूर ठेकेदार ठेका पद्धतीने आजतागायत एकही दिवस खंडित न करता संलग्न कार्यरत आहेत. अग्निशामक विभागात रूजू झाल्यापासून आग लागणे, पूरग्रस्त/आपत्कालीन परिस्थितीमध्ये बचाव कार्य करणे व इतर प्रकारच्या वर्दीवरही अनेक आणिबाणीच्या प्रसंगात स्वत:च्या जीवावर उदार होऊन त्यांनी कर्तव्य बजावले आहे. याबाबत महापालिकेने त्यांच्या कार्याचा सन्मान करून त्यांना प्रशस्तीपत्रकदेखील दिले आहे. मात्र त्यांना सेवेत कायम करण्याचा निर्ण झालेला नाही.
औद्योगिक न्यायालयाच्या आदेशालाही दिली बगल
सलग इतकी वर्षे सेवा बजावूनही त्या कामगारांना महानगरपालिकेच्या सेवेमध्ये सामील करून घेण्यात शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे नाईलाजाने या कर्मचाºयांनी औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला आहे. औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर महापालिकेने त्यांना अग्निशमन विभागाच्या कायमस्वरूपी सेवेत का सामावून घेण्यात आले नाही.