डहाणूत भव्य इग्निट्रॉन उत्साहात
By admin | Published: March 26, 2017 04:14 AM2017-03-26T04:14:08+5:302017-03-26T04:14:08+5:30
येथील रुस्तमजी अॅकॅडमी फॉर ग्लोबल करिअर महाविद्यालयात भव्य इग्निट्रॉनचे आयोजन करण्यात आले होते.
डहाणू : येथील रुस्तमजी अॅकॅडमी फॉर ग्लोबल करिअर महाविद्यालयात भव्य इग्निट्रॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. . या मध्ये रोबो वॉर, रोबो रेस, रोबो सॉकर, जंक यार्ड, प्रकल्प प्रदर्शन, प्रश्नमंजूषा, या सारख्या तंत्रज्ञानाशी निगडीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रीक कार, सोलर कार, हैड्रोजन बाईक, स्टीअरिंग सिस्टिम, गो कार्ट, इंजिन एक्सप्लोडेड प्रदर्शन, यासारख्या विविध प्रकारच्या प्रकल्पांचे सादरीकरण केले.
यातून ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची व नवनवीन प्रकल्पांची माहिती मिळावी या उद्देशाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक विनोद शिंदे यांनी दिली.(वार्ताहर)