वसईतही सापडली नकली अंडी?

By admin | Published: April 13, 2017 02:41 AM2017-04-13T02:41:11+5:302017-04-13T02:41:11+5:30

विरारमध्ये नकली अंडी असल्याची बाब उजेडात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वसईतील स्विटी डेव्हीड मिस्कीटा यांनीही नकली अंडी मिळाल्याची तक्रार केली आहे.

Fake egg found in Vasaiet? | वसईतही सापडली नकली अंडी?

वसईतही सापडली नकली अंडी?

Next

वसई : विरारमध्ये नकली अंडी असल्याची बाब उजेडात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वसईतील स्विटी डेव्हीड मिस्कीटा यांनीही नकली अंडी मिळाल्याची तक्रार केली आहे. स्विटी यांना बिग बाजारमधून नकली अंडी मिळाल्याचे उजेडात आले आहे. अंड्याचा नमुना अन्न व प्रशासन विभागाकडे पाठवण्यात येणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर याबाबत खुलासा होणार आहे.
आहारात महत्वाचे घटक असलेले अंडे आता आरोग्याशी खेळणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या बाजारपेठेत चिनची प्लॅस्टिकची नकली अंडी विकली जात आहेत. मंगळवारी विरारमध्ये मंदार मिंगेल यांनी नकली अंडी मिळाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बुधवारी वसईतील कतारेवाडी येथील स्विटी डेव्हीड मिस्कीटा यांनी बिग बाजारातून खरेदी केलेली अंडी बनावट असल्याचा आरोप केला आहे. (प्रतिनिधी)

आगीजवळ नेताच कवच पेटले : अंडे फोडत असताना त्याच्या दर्जाविषयी स्विटी यांना शंका आली. अंडी फुटत नव्हती. अंड्यांना आगीजवळ नेले असता कवचाने पेट घेतला. कवच जळत असताना प्लास्टिक जाळल्यासारखा वास येत होता. अंडे उकडले असता रबरासारखे चिवट व खेचले जाऊ लागले. त्यामुळे स्विटी मिस्कीटा यांनी ताबडतोब वसई विरार महापालिकेच्या वसई विभागीय कार्यालय गाठून तक्रार दाखल केली.

अंडे खराब असेल तर त्यातून दुर्गंधी येते. मात्र मी खरेदी केलेल्या अंड्याचा पिवळा बलक निघण्याऐवजी त्यातून पातळ पदार्थ बाहेर आला. कवच जळताना त्यातून प्लास्टिकचा वास येत होता, असा स्विटी यांचा आरोप आहे.

अंड्याचा नमुना अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच वसईतील बिग बाजारचे वरिष्ठ अधिकारी राहूल भांडारकर यांना याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती प्रभाग समितीचे सभापती प्रवीण शेट्टी यांनी दिली.

Web Title: Fake egg found in Vasaiet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.