जे.के.च्या सांडपाण्यामुळे शेतीचे नुकसान

By admin | Published: June 29, 2015 04:38 AM2015-06-29T04:38:10+5:302015-06-29T04:38:10+5:30

आंबिस्ते खुर्द येथील राजेश जाधव या शेतकऱ्याच्या शेतीत जे.के.फाउंडर्स या कंपनीने रासायनिक सांडपाणी सोडल्याने शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार तहसीलदारांकडे केली आहे.

Farm loss due to JK's sewage | जे.के.च्या सांडपाण्यामुळे शेतीचे नुकसान

जे.के.च्या सांडपाण्यामुळे शेतीचे नुकसान

Next

वाडा : तालुक्यातील आंबिस्ते खुर्द येथील राजेश जाधव या शेतकऱ्याच्या शेतीत जे.के.फाउंडर्स या कंपनीने रासायनिक सांडपाणी सोडल्याने शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार तहसीलदारांकडे केली असून कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वाडा तालुक्यातील अांबिस्ते खुर्द या गावाच्या हद्दीत जे.के. फाउंडर्स ही कंपनी आहे. या कंपनीत अ‍ॅल्युमिनियमचे रॉड बनविले जातात. या कंपनीने रासायनिक सांडपाणी येथील शेतकरी राजेश जाधव यांच्या गट क्रमांक २५२ व २५० मध्ये सोडले असल्याने भातशेतीचे नुकसान होत आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असून या शेतकऱ्याने भाताची पेरणी केलेली रोप करपून गेले आहेत. शेतीच्या बांधावर लावलेली फळझाडे करपून गेली आहेत. तसेच कंपनीतून निघणाऱ्या धुरामुळे ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास व इतर आजार होत असल्याचा आरोपही तक्रारीत केला आहे. यासंदर्भात जे.के. फाउंडर्स या कंपनीचे व्यवस्थापक संदीप चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता आमच्या कंपनीच्या सांडपाण्यामुळे शेतीचे कुठल्याही प्र्रकारचे नुकसान होत नाही तसेच शेतकऱ्यांच्या शेतीत सोडलेले सांडपाणी बंद करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Farm loss due to JK's sewage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.