शेतकरी लागला कामाला, नाचणी व वरई, उडीद पेरण्यांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:27 PM2019-06-14T23:27:48+5:302019-06-14T23:28:00+5:30
तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ असल्याने येथे नागली, वरई, भात, उडीद, तूर, खुरसानी या पिकांची पेरणी ही कोरड्या जागेत करावी लागत आहे.
जव्हार : गेल्या दोन दिवसांपासून संध्याकाळच्या वेळी पाऊसाला सुरुवात होत असल्यामुळ ग्रामीण भागातील अल्प भूधारक आदिवासी शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. माळरानावर कोरड्या दमट मातीत नांगरणीचे दृष्य जागोजागी दिसत आहे.
तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ असल्याने येथे नागली, वरई, भात, उडीद, तूर, खुरसानी या पिकांची पेरणी ही कोरड्या जागेत करावी लागत आहे. या डोंगराळ भागात नागली, वरई, भात, तूर, खुरसानी या प्रमुख पिकांची पेरणी मोठा पाऊस होण्याआधी करावी लागते.
या भागातील पावसाच्या पाण्यावर हंगामी शेती करावी लागते कारण येथील पारंपारिक शेती डोंगराळ भागात होत असल्याने पडलेला पाऊस जमिनीत मुरून राहत नाही. पावसाचे पाणी नदी, नाले व झऱ्यांमार्फत वाहुन जोतो. या भागामध्ये वर्षभर मोलमजूरीकरीता परगावी जाणारे गावकरी खास शेतीच्या कामांसाठी गावी परतले आहेत. वाढते बियाणांचे व खतांच्या किमतीमुळे आता शेती परवडत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांची बालून दाखवल. फक्त परंपरा म्हणून आम्ही शेतता राबत असल्याचे ते म्हणाले.