तलासरी : तलासरी पंचायत समितीच्या कृषी विभागाच्यावतीने तालुक्यातील सावरोली येथील प्रगतिशील शेतकरी रमण मोर याच्या शेत वाडीवर शेतकरी शिबीर ठेवण्यात आले होते, मात्र या शिबिरास नियोजना अभावी अल्प प्रतिसाद लाभला. मात्र, आलल्या संख्येमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होतीया शिबिरास आमदार पास्कल धनारे यांच्यासह सभापती सविता डावरे , उपसभापती वनशा दुमाडा , जिल्हा परिषद सदस्य धर्मा गोवारी, गीता धामोडे, जयवंती घोरखाना, कौशिका डोंबरे, सुनीता शिंगडा, पंचायत समिती सदस्य सुनील निकुंभ, प्रकाश सांबर, उर्मिला शिंगडे, भानुदास भोये, चिम्प फरले, रमिला झरिवा तसेच कृषी अधिकारी बाळासाहेब मांदले, विस्तार अधिकारी एन. एन. पाटील, गट विकास अधिकारी बी. व्ही. नाळे हे उपस्थित होते.कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे यांनी शासनाच्या योजना विषयी माहिती दिली. आमदार पास्कल धनारे यांनी अधिकाऱ्यांनी शेतकºयांना योग्य मार्गदर्शन करून शेतीतून जास्त उत्पादन मिळवून आपली प्रगती कशी करता येईल याकडे विशेष लक्ष द्यावे, शेतकºयांनीही भात शेती नंतर भाजीपाल्याची लागवड करावी असे त्यांनी सांगितले. तालुक्याचा शेतकरी मेळावा असताना या मेळाव्याची माहिती शेतकºयांना अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य प्रकारे न केल्याने मेळाव्याला उपस्थिती नगण्य होती.
सावरोलीत शेतकरी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:37 PM