सुरेश लोखंडेठाणे : मोठा गाजावाजा करून ठाणे, पालघरसह रायगड या तिन जिल्ह्यातील महामार्गांवरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी अवजड वाहने थांबवून अन्य वाहनाना प्राधान्याने सोडण्यासाठीच्या उपाययोजनासह महापालिकेची ११ वाहनतळे ताब्यात घेऊन शहारातील वाहनकोंडीवरील उपाययोजना केवळ फार्स ठरला आहे. ठाण्याचे तत्कालिन पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे तत्कालिन पालकमंत्री व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या आदेशांवरील कारवाईचा फज्जा उडाला आहे. याबाबत कोणत्याही उपाययोजना तिन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने न केल्याने ऐन दिवाळीत महामार्गांसह शहरांतील अतंतर्गत रस्त्यांवर तासनतास वाहतूककोंडीत अडकावे लागत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
घोडबंदर रोड, शीळफाटा, मुंबई -नाशिक, मुंबई- अहमदाबाद महामार्ग, सायन-पनवेल महामार्गासह ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, वसई-विरार या शहरांतील अंतर्गत रस्त्यांवर जीवघेणी वाहतूककोंडी गेल्या दोन दिवसांपासून सतत वाढत आहे. एक ते दीड तासाची कोंडी रविवारीदेखील या महामार्गांवर वाहनधारकांनी अनुभवत आहेत.
शहरातील कोंडीमुळे पादचाऱ्यांनादेखील जीव मुठीत घेऊन रस्ता कापावा लागत आहे. यामध्ये ठाणेसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, पनवेल आदी शहरांमध्ये या वाहतूककोंडीचा फटका सर्वसामान्याना बसत आहे. यामुळे एक महिन्यापूर्वी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी या कोंडीवरील उपाययोजनांसाठी व खड्डे भरण्यासाठी गाजावाजा करून ठाणे, पालघर, रायगड जिल्हा प्रशासनाची घेतलेली बैठक केवळ फार्स ठरली आहे. या बैठकीतील आदेशांनुसार कारवाई न झाल्यामुळेच ऐन दिवाळीतही नागरिकांना जीवघेण्या कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे भरण्याच्या आदेशांची अंमलबजावणी ठिकठिकाणी अजूनही पूर्ण झाली नाही. तर महामार्गांवर होणारी वाहतूककोंडी दूर करण्यासाठी अवजड वाहने ठिकठिकाणी थांबवून ते काही वेळेनंतर टप्प्याटप्याटप्याने सोडण्याच्या आदेशांचेही तीनतेरा झाल्यामुळे घोडबंदर रोड, मुंबई नाशिक महामार्ग, शीळफाटा, कळंबोली नाका, पनवेल उरण रस्ता, मुंब्रा बायपास आदीं महामार्गांवर मोठ्याप्रमाणात कोंडी होते. ती दूर करण्यासाठी जेएनपीटीकडून येणारी अजवड वाहने त्यांच्याकडे असलेल्या भूखंडावर रोखायची यानंतर ती टप्प्याटप्पयाने सोडायची. यामुळे घोडबंदर महामार्गासह अन्यही रस्त्यावर कोंडी होणार नसल्याचे शिंदे यांनी निदर्शनात आणून देऊन आदेश जारी केले होते.अवजड वाहने टप्प्याटप्प्याने सोडण्याचे आदेश कागदावरचपालघरकडून घोडबंदर,अहमदाबाद महामार्गावरून येणाºया अजवड वाहनांना व नाशिक महामार्गावरील अवजड वाहनांना रोखण्यासाठी मोठमोठ्या भूखंडांचा तत्काळ शोध घेण्याचे आदेशही देण्यात आले होते. या भूखंडावर ही अवजड वाहने थांबवून ती टप्प्याटप्प्याने सोडावी असे निर्देश होते. पडघ्याजवळ किंवा शहापूर, मुरबाड परिसरात भूखंड शोधण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत. मात्र, त्यास अनुसरून भूखंडावर अवजड वाहने वेटिंगवर उभी ठेवून ती टप्प्याटप्प्याने सोडण्याच्या कारवाई अजून कूर्मगतीने सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासह एमएमआरडीए, एमएसआरडीसी, जेनपीटी, महानगरपालिका,नगरपालिका आणि ठाणे, पालघरसह रायगड या तिन्ही जिल्ह्यांचे प्रशासन आदी यंत्रणांनी समन्वय साधून वाहतूककोंडीवर एकत्रित उपाययोजनांची गरज व्यक्त करण्यात आली आहे.वाहनतळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया अडकली कुठे : ठाणे शहरामध्ये येणारे आणि बाहेर जाणारे रस्ते यावर होणाºया कोंडीची कारणे आणि त्यावर संबंधित यंत्रणेकडून करण्यात येणाºया उपाययोजनांसाठी जेएनपीटीमध्ये असलेल्या वाहनतळाचा तत्काळ वापर सुरू करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी रायगड जिल्हाधिकाºयांनी लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करण्यास शिंदे यांनी सांगितले होते. याप्रमाणेच सिडकोकडे असलेली वाहनतळे तत्काळ हस्तांतरीत करण्यासह पालघर जिल्हाधिकारी यांनी पालघरमधील दापचरी, मनोर, चारोटीनाका येथे वाहनतळांसाठी जागेची उपलब्धता करून देण्याच्या सूचना शिंदे यांनी केल्या आहेत.