बोईसर : पावसाळी वातावरण व वाऱ्यामुळे मागील पाच दिवसापासून बोईसर परिसरात तासंतास वीज खंडित होत असल्याने महावितरणचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. दिवसा उकाडा व रात्री काळोख यामुळे नागरिक, व्यावसायिक, उद्योजक प्रचंड त्रस्त झाले असून तासन्तास खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे रु ग्णसेवा, बॅँका, व्यवसाय कोलमडले आहेत. पाण्याविना नागरिकांचे प्रचंड हाल झाले अनेक ठिकाणी झाड व विजेची खांबे कोसळण्याच्या अनेक घटना घडल्याने महावितरणचे मान्सून प्री मेंटेनन्स काय केले? असा सवाल नागरिक विचारत आहेत.इन्व्हर्टर व जनरेटर स्तब्ध
बहुसंख्य मध्यम वर्ग व उच्चभ्रूकडे असलेल्या ईन्व्हर्टरच्या बॅटरी बॅकअप संपून विजेअभावी बॅटरी चार्जिंग होत नव्हती. काही रुग्णालय व कार्यालयांमध्ये वापरात असलेले जनरेटरही तासन्तास चालवून गरम होत असल्यामुळे हक्काची वीज देणारी ही दोन्ही यंत्रही हळूहळू स्तब्ध होऊन सर्वत्र अंधार पसरला होता.वादळी वारा व पावसामुळे वीज वाहक तारांवर झाडे कोसळण्याच्या घटनेबरोबरच डिस्क व पिन इन्सुलेटर पंक्चर होत होते तर काही ठिकाणी पोल पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. तर महावितरणाचे कर्मचारी व अधिकारी अहोरात्र काम करून वीजपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते. पहिल्या पावसात अशा घटना घडतात तरी नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती.- रुपेश पाटील, स. का. अभियंता, महावितरणरात्रंदिवस वीज पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित होत असल्याने जनरेटरचा बॅकअपही संपत होता तर शस्त्रक्रिये पूर्वी लागणाºया पॅथॉलॉजी टेस्टही ठप्प झाल्या. आॅपरेशन सुरू असताना मध्येच वीज गेल्यास रु ग्णाच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. यामुळे अनेक अत्यवस्थ रुग्णांना बाहेर पाठविले तर काही शस्त्रक्रि या पुढे ढकलल्या. रु ग्णांना पंखा व वातानुकूलित शिवाय राहावे लागत आहे तर हॉस्पिटलमध्ये पाणी नसल्याने रु ग्णांचे अतोनात हाल झाले- डॉ. संतोष संगारे, अस्थिरोग तज्ज्ञरुग्णसेवा ठप्प, शस्त्रक्रिया पुढे ढकलल्यासोमवार (दि.१०) पासून ते शुक्र वार (दि.१४ ) पर्यंत रोज सहा ते दहा तासापर्यंत वीजपुरवठा कमी-जास्त फरकाने खंडित होत आहे. त्यामुळे विजेअभावी पाणीपुरवठा विभाग ठप्प होत आहे. त्याच बरोबर इमारतीच्या वरच्या टाकीमध्ये पाणी चढविता येत तर नव्हतेच टँकरही ठप्प झाल्याने हजारो नागरिकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल झाले. बोईसरला प्रसूतीपासून लहान मुलांचे, डोळ्यांचे, जनरल तसेच आॅर्थोपेडिक अशा सर्व प्रकारची अनेक रुग्णालये आहेत.विजेअभावी रुग्णावर शस्त्रक्रिया करता आली नाही तर काही शस्त्रक्रि या पुढे ढकलल्या तर चिंताजनक रु ग्णांना गुजरात, वसई व मुंबईला पाठविण्यात आले. त्याचबरोबर सिटी स्कॅनिंग, सोनोग्राफी, एक्स-रे, पॅथॉलॉजी इत्यादी टेस्ट सर्व काही वेळ ठप्प झाल्या होत्या. तर झेरॉक्स, इस्त्री, हॉटेल व बियर शॉपी, आईस्क्र ीम, सायबर , दूध दही वथंडपेय विक्र ेते, आणि आर्थिक संस्था इ. अनेक व्यवसायावरही परिणाम झाला.सोमवारपासून असे होत होते बिघाडसोमवार (दि.१०) रात्री ८.३० च्या सुमारास वादळी वाºयासह पावसाला सुरु वात होताच तारापूर विद्या मंदिरसमोर कंडक्टर तुटले तर सरावली भागात कंडक्टरवर झाडे कोसळली त्याचप्रमाणे रोनक धाब्याजवळ डिस्क व पिना व पंक्चर होऊन बरेच तास वीज गायब.मंगळवार (दि.११) पाच नंबर फिडरचे ३ हायटेंशन (एच.टी.) लाईनचे पोल कोसळले.बुधवार (दि.१२) हॉटेल सरोवर व गंगोत्री मागील अशा ३ ठिकाणी डीपी स्ट्रक्चरवर झाड कोसळले.गुरुवार (दि.१३) स्वरु प नगर समोरील वीज वाहक तारांवर झाडांची फांदी दुपारी कोसळून खांब कोसळला, तर रात्री टाकी नाक्याजवळ जंपर तुटल्यामुळे दुपारी दोनच्या सुमारास गेलेली वीज रात्री ११.४५ वाजता परतली.शुक्रवार (दि.१४) पहाटे ४.३५ पासून ६.३४ वाजेपर्यंत ३३ के.व्ही.लाईन ब्रेक डाऊन झाली होती तर सकाळी ७.३१ पासून तारापूर अणुऊर्जा केंद्र कर्मचारी वसाहतीतील ३३/११ के.व्ही. क्षमतेच्या सब स्टेशनमधील १० एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये मोठा बिघाड होऊन वीज गेली ती ३.५३ वाजता परतली.