कचरा गाडी सगळीकडे दुर्गंधी सोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 10:42 PM2019-06-06T22:42:54+5:302019-06-06T22:43:41+5:30

गाड्यांचा अजब प्रकार : इडीटी पावडरचा तुटवडा असल्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता

 Garbage Disposal Tidy Everywhere | कचरा गाडी सगळीकडे दुर्गंधी सोडी

कचरा गाडी सगळीकडे दुर्गंधी सोडी

Next

नालासोपारा : वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुविधा मिळणार आणि शहरांचा विकास होईल असे गाजर नागरिकांना दाखवून राजकारण्यांनी नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करून वसई विरार शहर महानगरपालिका ३ जुलै २००९ रोजी उदयास आली. दहा वर्षे मनपा उदयाला येऊन सुद्धा नागरिकांना मूलभूत सुविधा, आरोग्य , पाणी, रस्ते यापासून वंचीत आहे. सोयीसुविधांसाठी करोडचे बजेट मनपा पास करते पण लोकांच्या आरोग्याकडे किती दुर्लक्ष करत आहे यांचे जिवंत उदाहरण समोर आले आहे. मनपाच्या कचऱ्याच्या गाड्या कशा दुर्गंधी पसरवत आहे व कसे रोगराईला आमंत्रण देत आहे ही बाब उघड झाली आहे.

नालासोपारा शहरात सुमारे १० ते १५ लाख लोकसंख्या आहे. पूर्वेकडे आणि पच्छिमेकडील कचरा गोळा करण्यासाठी मनपाच्या लहान मोठ्या मिळून ५० च्या वर गाड्या आहे. पण ज्या विभागात या गाड्या कचरा गोळा करण्यास जातात त्याठिकाणी घाण वास आणि घाण पाणी रस्त्यावर पडले जाते. कचरा उचलून झाल्यावर त्याठिकाणी इिडटी पावडर मारावे लागते पण इटीडी पावडरचा तुटवडा असल्यामुळे सफाई कर्मचारी रोगराई किंवा दुर्गंधी पसरू नये म्हणून पावडर मारत नाही. रस्त्यावरून येणाºया जाणाºया लोकांना अक्षरशा नाक धरून जावे लागते आहे.

इटीडीचा तुटवडा
नालासोपारा शहराची लोकसंख्या लाखोंच्या घरात आहे. प्रत्येक विभागात कचºयाच्या गाड्या कचरा गोळा करण्यासाठी जातात पण कचरा उचलून झाल्यावर इिडटी पावडर रोगराई, दुर्गंधी आणि घाण पसरू नये म्हणून मारावी लागते. पण इतकी लोकसंख्या असतानाही अगदी थोड्या फार प्रमाणात पावडर स्वच्छता विभागात असते. तुटपुंज्या पावडरने नालासोपारा नागरिकांचे आरोग्याकडे काय लक्ष देणार.

सफाई कर्मचाऱ्यांच्या साहित्याचीही कमतरता
महानगरपालिकेच्या कचरा गाड्यांवरील कर्मचाºयांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना म्हणून पायात गंबूट, हातामध्ये हातमोजे, नाकाचे मास्क अश्या अनेक वस्तूंची सोय करून देणे गरजेचे होते पण या साहित्यांची कमतरता असल्याने त्यांच्या आरोग्याशीही महापालिका प्रशासन खेळत आहे.

कचºयाच्या गाड्यांसोबत इिडटी पावडर मारण्यासाठी तुटवडा असल्यामुळे देत नाही. कमी पुरवठा होत असल्यामुळे सफाई कर्मचारी इिडटी पावडर मारू शकत नाही. ५० च्या वर कचºयाच्या गाड्या असल्यामुळे कोणाकोणाला इडीटी पावडर देणार. - सिताराम तारमाळे,
स्वच्छता निरीक्षक, नालासोपारा

दुर्घधी आणि वास याव्यतिरिक्त घाण पसरू नये म्हणून उपाययोजना करायला सांगणार. कचºयाच्या गाडीने घाण उचलल्यावर त्याठिकाणी वास पसरू नये म्हणून इिडटी पावडर मारणे आवश्यक आहे. कचरा उचलल्यावर इिडटी पावडर सफाई कर्मचारी का मारत नाही आणि किती इिडटी पावडर स्वच्छता विभागात आहे याची माहिती घेऊन उपाययोजना करणार. - बळीराम पवार, आयुक्त,
वसई विरार महानगरपालिका

मोठे मोठे गाजर दाखवून मनपा आल्यावर सुविधा मिळणार असे सांगितले पण प्रत्यक्षात उलटेच अनुभवायला मिळत आहे. गेल्या मिहन्यापासून मनपाचे पाणी लोकांना मिळत नसल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. आता या कचºयाच्या गाड्या कचरा उचलल्यावर दुर्गंधी आणि घाण वास पसरू नये म्हणून काही उपाययोजना करत नाही. नागरिकांच्या आरोग्याशी मनपा जीवघेणा खेळ खेळत आहे. - हेमंत रोखीत, संतप्त नागरिक

Web Title:  Garbage Disposal Tidy Everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.