पालघरचे मुख्यालय सिडको बांधणार?

By admin | Published: June 29, 2015 04:28 AM2015-06-29T04:28:55+5:302015-06-29T04:28:55+5:30

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व महत्वपूर्ण विभागाची कार्यालये कोळगाव येथील दुग्धविकास विभागाच्या मोकळ्या जागेत उभा करण्याचा प्रस्तावास प्रशासकीय पातळीवरून शिक्कामोर्तब झाले आहे.

Headquarters of Palghar to build CIDCO? | पालघरचे मुख्यालय सिडको बांधणार?

पालघरचे मुख्यालय सिडको बांधणार?

Next

हितेन नाईक, पालघर
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व महत्वपूर्ण विभागाची कार्यालये कोळगाव येथील दुग्धविकास विभागाच्या मोकळ्या जागेत उभा करण्याचा प्रस्तावास प्रशासकीय पातळीवरून शिक्कामोर्तब झाले असले तरी निधीची चणचण असल्याने सर्व कार्यालये उभारण्याची जबाबदारी सिडकोकडे देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनीही अनुकूलता दर्शविल्याचे विश्वसनीय सूत्राकडून कळते.
विभाजन झाल्यानंतर पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर जिल्हा कार्यालयासाठी कोळगावच्या दुग्धविकास विभागाची जागा शासन स्तरावरून सुचविण्यात आली. पाणी, जागा, रेल्वे, बस, वैद्यकीय शैक्षणिक सोयीची उपलब्धता या निकषामध्ये पालघरची बाजू उजवी ठरल्याने तसेच कोळगाव व मोरे कुरण या भागात दुग्धविकास विभागाची सुमारे ४४० हेक्टर जमीन उपलब्ध असल्याने आघाडी सरकारने पालघर जिल्ह्याची घोषणा केली होती. दुग्धविभागाच्या ४४० हेक्टर जमिनींपैकी १४० हेक्टर जमीन जिल्हा कार्यालय उभारणीसाठी देवून उर्वरित जमीन सिडकोला द्यायची व त्या मोबदल्यात सिडको जिल्हा कार्यालयाची उभारणी करून देणार आहे आणि उर्वरित ३०० हेक्टर जमीनीवर गृहनिर्माण, वाणिज्यीक प्रकल्प आदिंची उभारणी करणार असल्याचा प्रस्ताव शासन स्तरावरून करण्यात आला होता.
शासनाकडे निधीची चणचण असल्याने जिल्हानिर्मितीनंतरही १० महिन्याचा कालावधी उलटूनही जिल्हा कार्यालये मिळेल त्या जागेत उभारण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्याची प्रशासकीय गाडी रुळावर येण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शासनाने आपल्याकडील उपलब्ध जागेचा विनीयोग अत्यंत खुबीने करण्याचे ठरविले असून आपल्याजवळील ३०० हेक्टर जमीन सिडकोला १४० हेक्टर जमिनीवर प्रशस्त व आदर्श असे जिल्हा प्रशासकीय संकुल उभे करून द्यावयाचे या निर्णयाप्रत शासन आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.

सर्वसामान्यांना मात्र आनंद
४पालघर जिल्हा प्रशासकीय कार्यालय संकुल सिडकोने उभे करून देण्याच्या मोबदल्यात सिडकोला पालघर येथील जमीन विकसित करण्यास देण्यासाठी शासनाचा प्रस्तावामुळे सिडकोचा शिरकाव या परिसरात होणार असून तिचा गृहप्रकल्प साकारल्यास सहाजिकच घरांच्या व जमिनीच्या किंमती मोठ्या प्रमाणावर खाली येणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. पालघर व परिसरात कमीत कमी २० ते २५ हजार फ्लॅटस विक्रीसाठी उपलब्ध असून विक्रीचे मार्केट डाऊन असल्याने खाजगी बिल्डर्सना याचा मोठा फटका बसण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय तसेच उच्च वर्गाने फ्लॅटच्या किंमती खाली येणार असल्याच्या शक्यतेचे स्वागत केले आहे. उतरलेल्या दराचा फायदा सर्वसामान्यांंना होणार असल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Headquarters of Palghar to build CIDCO?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.