हकीमजी हायस्कूलची पोरं हुश्शार
By admin | Published: April 13, 2017 02:35 AM2017-04-13T02:35:45+5:302017-04-13T02:35:45+5:30
लोकमतद्वारे आयोजित संस्काराचे मोती हा उपक्र म बोर्डीतील सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयात राबविण्यात आला. त्या अंतर्गत प्राचार्या आशा वर्तक यांच्या हस्ते
बोर्डी : लोकमतद्वारे आयोजित संस्काराचे मोती हा उपक्र म बोर्डीतील सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयात राबविण्यात आला. त्या अंतर्गत प्राचार्या आशा वर्तक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिस व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
या वेळी समिधा बोरसे या आठवी (अ) या वर्गातील विद्यार्थिनी फ्लाइंग टॉयची मानकरी ठरली. ८ वी (ब) मधील सेजल मोरे हिला सॅक तर मयुरेश बळवंत राऊत ७ वी (ब) च्या विद्यार्थ्याला बॅडमिंटन रॅकेट देण्यात आले. अन्य दहा विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस आणि उर्विरत सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
या शाळेच्या प्राचार्या आशा वर्तक यांनी लोकमतने राबविलेल्या स्पर्धेचे कौतूक करताना अभ्यासपूरक उपक्र म असे गौरवोद्गार काढले. शंभर दिवस राबविण्यात आलेल्या या उपक्र मामुळे विद्यार्थ्यांना परिसरातील घडामोडी, लोकमत मधील बातमीच्या माध्यमातून माहीत झाल्या. त्यामध्ये शाळेतील विविध कार्यक्र मांचाही समावेश होता. या उपक्र मात सहभागी विद्यार्थी, पालक, वर्गशिक्षक आणि लोकमतचे त्यांनी आभार मानले. हा उपक्रम यशस्वि करण्यासाठी श्वेता व राकेश सावे या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.