वाडा : वाडा तालुक्यातील भातशेती नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, आदी मागण्यांचे निवेदन वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके यांनी वाडा तहसीलदार उद्धव कदम यांना दिले आहे. यावेळी वाडा पंचायत समितीच्या उपसभापती मेघना पाटील तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
वाडा तालुक्यात अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. शेतकरी वर्गही पावसामुळे झालेल्या भातशेती नुकसानीने हतबल झाला आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. वाडा तालुक्यात परतीच्या पावसाने ओल्या दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण केली आहे. शेतकरी वर्गाची भात शेती पाण्यात आहे. त्यामळे पिकलेले भात पीक हातातोंडाशी येईल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. वाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीने शेतकरी वर्गाचे पंचनामे करावेत, पीक विम्याचेही पैसे मिळवून देण्यासाठी विमा कंपनीला निर्देशित करण्याची मागणी आहे.दरोडा यांचेही वाडा तहसीलदारांना निवेदनच्वाडा : शहापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आ. दौलत दरोडा यांनी वाडा तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांना निवेदन देत तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्याची मागणी केली. शहापूर मतदारसंघात वाडा तालुक्यातील पूर्व विभाग आणि अबीटघर विभागाचा समावेश आहे. आ. दरोडा यांनी येथील नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतांना भेट देत नुकसानीची पाहणी केली.
च्त्यानंतर वाडा तहसील कार्यालयात येऊन तहसीलदार डॉ. उद्धव कदम आणि तालुका कृषी अधिकारी माधव हसे यांना निवेदन देत नुकसनीबाबत चर्चा केली. यावेळी शासकीय अधिकाºयांनी आपल्या स्तरावर तातडीने पंचनामे करावेत आणि लवकरात लवकर शासन दरबारी वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठवून शेतकºयांना तातडीने नुकसानभरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात आले असून अद्याप नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे निदर्शनात आणून देत त्याबाबतही शेतकºयांना मदत मिळवून देण्याच्या सूचना या वेळी आमदारांनी केल्या.