पिपाणी अन् ताशा वाजवून वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:47 PM2018-03-27T23:47:09+5:302018-03-27T23:47:09+5:30
विक्रमगड नगरपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांनी पाणीपट्टीची वारंवार मागणी करुन ती थकीत ठेवल्याने या वसुलीसाठी गेल्या
तलवाडा : विक्रमगड नगरपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांनी पाणीपट्टीची वारंवार मागणी करुन ती थकीत ठेवल्याने या वसुलीसाठी गेल्या काही दिवसांपासून दहा ते बारा कर्मचाऱ्यांचे वसूली पथक घेऊन दिवसभर थकीतबाकीदाराच्या दारासमोर पिपाणी व ढोलकीचे वादय वाजवत वसुलीचा नवा फंडा आजमविला जात असल्याने बाकीदार लाजत का होईना पैसे भरतांना दिसत आहेत़
विक्रमगड ग्रामपंचायत असतांना ते आता नगरपंचायत झाली तरी पाणीपट्टीची वसुली होत नसल्याने मोठयाप्रमाणावर थकबाकी वाढतचालेली असल्याने नगपंचायतीने नाना उपाय योजले मात्र हवी तशी वसुली होत नसल्याचे समोर आले होते. त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने रिक्षावर भोंगा लाऊन काही प्रमाणात वसुली केली मात्र या नव्या फंड्यामध्ये दोन कर्मचारी ढोलकी वाजवत व दोन कर्मचारी पिपानी वाजवत तर दोन कर्मचारी वसुली पथकाचा बॅनर घेऊन थकबाकीदाराच्या घरोघरी वाजत गाजत वसुली करीत आहे़ मात्र दारासमोर पथक पाहुन लाजेपोटी का होईन बाकी भरली जात असल्याने नगरपंचायतीच्या वसुलीत वाढ होतांना दिसत आहे़ दरम्यान, आतापर्यत जवळ जवळ १८ लाखांची वसुली झाली असल्याची व १२ लाखांची वसुली थकीत असल्याचे पाणीपटटी विभागाच्या कर्मचाºयांनी लोकमतला माहिती दिली. एकंदर वसूलीचा हा फंडा गावात चर्चेचा विषय ठरला आहे.