वसईतील खाजगी शाळांमधून लूटमार

By admin | Published: May 27, 2017 02:04 AM2017-05-27T02:04:25+5:302017-05-27T02:04:25+5:30

वसईतील खाजगी शाळाचालक शिक्षण शुल्कांच्या नावाखाली विद्यार्थी आणि पालकांची भरमसाठी लुट करीत असल्याची तक्रार भाजपाचे जिल्हा

Lootmar in private schools in Vasai | वसईतील खाजगी शाळांमधून लूटमार

वसईतील खाजगी शाळांमधून लूटमार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसईतील खाजगी शाळाचालक शिक्षण शुल्कांच्या नावाखाली विद्यार्थी आणि पालकांची भरमसाठी लुट करीत असल्याची तक्रार भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजन नाईक यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.
वसई विरार महापालिका हद्दीत दोनशेहून अधिक खाजगी शाळा आहेत. यातील काही शाळा अनधिकृत आहेत. तर अधिकृत शाळांमध्ये मुलांना खेळण्यासाठी पटांगण नाही. शाळेत विद्यार्थ्यांना पुरेशा सोयी सुविधा नाहीत. मात्र, असे असताना त्या भरमसाठी शिक्षण शुल्क आकारीत आहेत. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम फी, सक्तीची सहल शुल्क, स्रेहसंम्मेलन शुल्क, संगणक प्रशिक्षण शुल्क, अ‍ॅक्टीव्हीटी फी, स्पोर्ट फी, ग्रुप फोटो फी, मिसलेनियस फी आदींच्या नावाखाली शुल्क वसुल केली जाते. यावर कहर म्हणजे बहुतेक शाळांमधून गणवेश आणि वह्या पुस्तके घेण्याची सक्ती केली जात आहे. किंवा शाळा सांगेल त्याच दुकानातून खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे पालकांना बाजारभावापेक्षा तीनपट अधिक पैसे खर्च करावे लागत असल्याचा नाईक यांचा आरोप आहे.
गांभिर्याची बाब म्हणजे शाळेत भरणा केलेल्या डोनेशन व इतर फीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रक्कम रोखीने स्विकारली जात असून स्विकारण्यात आलेल्या पूर्ण रकमांची पोचपावती मिळत नाही. तसेच काही तुरळक फी वगळता इतर शुल्क रोखीनेच भरण्याची सक्ती करण्यात येत असल्याची नाईक यांनी तक्रार केली आहे. अनेक शाळांमध्ये सक्षम गुणवत्ताधारक शिक्षकांचा अभाव आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडेच ट्युशनला जाण्यासाठी बंधने घातली जातात. शाळेतील असलेल्या बसेसमध्ये संस्थाचालकांची भागिदारी अथवा कमिशन ठरलेले असते. त्यामुळे बस चालक ठरवतील तितकेच भाडे देण्याशिवाय पालकांना मार्ग नसते. असोसिएशनच्या संगनमताने संस्था चालक स्वत:च्या आर्थिक फायद्याचे निर्णय घेत असल्याकडेही नाईक यांनी शिक्षणमंत्री तावडे यांचे लक्ष वेधले आहे.

Web Title: Lootmar in private schools in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.