हरवलेला करण दोन वर्षानंतर सापडला
By admin | Published: July 28, 2016 03:33 AM2016-07-28T03:33:36+5:302016-07-28T03:33:36+5:30
गेल दोन वर्षांपासुन हरवलेल्या १२ वर्षाच्या करणला शोधून काढण्यात विरार पोलिसांना यश मिळाले. भिवंडी येथील एका हॉटेलमध्ये काम करीत असलेल्या करणला पोलिसांनी
विरार : गेल दोन वर्षांपासुन हरवलेल्या १२ वर्षाच्या करणला शोधून काढण्यात विरार पोलिसांना यश मिळाले. भिवंडी येथील एका हॉटेलमध्ये काम करीत असलेल्या करणला पोलिसांनी त्याच्या पालकांच ताब्यात दिले.
दोन वर्षापासून हरवलेला १२ वर्षीय करण सापडला. विरार पोलिसांनी अथक परिश्रमातून शोधले करणला. भिवंडी येथील एका हॉटेलमध्ये करण काम करत होता. तेथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याला त्याच्या परिवाराकडे सोपवले. करण राजभर, उत्तप्रदेश येथे राहणारा आहे. तो भार्इंदर उत्तन येथे आपल्या भावाकडे राहायला आला होता. उत्तन सागरी किनारी फिरायला गेले असता तेथील बस स्थानकावरून करण २०१४ साली हरवला होता. यावेळी त्याच्या भावाकडे त्याचा फोटो नसल्याने त्यांनी पोलिसांनी त्याची तक्रार घेतली नव्हती. पण नातेवाईकांचा शोध सुरूच होता.
करण घर शोधत शोधत विरारला आला होता. घराचा पत्ता माहित नसल्याने तो रस्त्यावर उपाशी तापाशी वणवण फिरत होता. अशा अवस्थेत त्याला सकवार विरार येथील एका आदिवाशी नागरीक नत्थू बतराने आपल घरी आणले. त्याला आपल्याकडे ठेऊन घेऊन त्याचा सांभाळ करू लागला.पण परिस्थिती गरीबीची असल्याने त्याचा सांभाळ करणे कठीण होऊ लागल्याने करण बतरा ज्या हॉटेल वर काम करत होता तेथे काम करू लागला. पण नीट वागणूक न मिळाल्याने तो तेथून पाळला. यावेळी बतरा यांनी विरार पोलिसांत २०१५ रोजी कारण हरवल्याची तक्रार दिली होती. (प्रतिनिधी)