कुंर्झे ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदीचा ठराव बहुमताने संमत
By admin | Published: October 25, 2016 03:27 AM2016-10-25T03:27:11+5:302016-10-25T03:27:11+5:30
या तालुक्यातील कुंर्झे या १८ पाड्यांच्या व पाच हजारांची लोकसंख्या असलेल्या गावाने दारुबंदीचा ठराव संमत करून नवा आदर्श निर्माण केला आहे. याच गावत दारु मुक्तीचे केंद्र
- संजय नेवे, विक्र मगड
या तालुक्यातील कुंर्झे या १८ पाड्यांच्या व पाच हजारांची लोकसंख्या असलेल्या गावाने दारुबंदीचा ठराव संमत करून नवा आदर्श निर्माण केला आहे. याच गावत दारु मुक्तीचे केंद्र चालवणारे, पंचायत समितीचे सदस्य विजय वेखंडे यांच्या पुढाकरातून या गावातील दारुविरुद्ध लढणाऱ्या बायकांनी त्यांना साथ दिली. या रणरागीणी साध्या आहेत. शेतात, घरात राबणाऱ्या, गुराढोरांची काळजी घेणाऱ्या, पोरांना धपाटे घालत शाळेत घालणाऱ्या, चुलीशी राबणाऱ्या, काही अक्षर ओळख नसणाऱ्या तर काहीजणी जेमतेम काही इयत्ता शिकलेल्या. त्या स्वत:साठी, आपल्या संसारासाठी, मुलाबाळाचा उज्वल भविष्यासाठी कुटुंबासाठी लढताहेत. त्यांनी दारू बंदीचा प्रयत्न केला आहे. इथे बाईची लढाई सुरु झाली आहे. घरापासून. त्यांच्या घरातल्या पुरुषांचे आणि पर्यायाने त्यांचं, पोराबाळांचं जगणं विस्कटून टाकणारी दारू गावातून हद्दपार करण्यासाठी त्या रस्त्यावर उतरल्यात. या लढाईत त्या स्वत:च्या नवऱ्याविरुद्ध, कुटुंबाविरुद्ध, समाजातल्या बड्या हस्तीविरुद्ध, राजकारण्यांविरुद्ध उभ्या आहेत. दबाव आहे, तरीही त्यांचे लढणे चालू आहे. त्याच्यासोबत आहेत ते विक्र मगड पोलिस म्हणून त्यांच्या पंखाना बळ आले आहे.
विक्रमगड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली कुंर्झे ग्रामपंचायतीने दि. २० आॅक्टोबर २०१६ रोजी आयोजीत केलेल्या विशेष महिला ग्रामसभेत उपस्थित महिलांनी १०० टक्के मतदानाने दारु बंदीचा ठराव संमत करून पालघर जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे. पंचायत समितीचे सदस्य असलेले विजय वेखेंडे यांनी दारु मुक्तीचा पहिला प्रयत्न आपल्या गावापासून सुरु केला आहे. दारू सोडा संसार जोडा हे त्यांचे पुस्तक प्रकाशित आहे. या बाबत त्यानी महिलांचा विशेष सभेत माहिती दिली. १०० टक्के गावाच्या दारु बंदीसाठी उपाय योजना म्हणून या वेळी गावातील महिलांची समिती स्थापन केली आहे. दारू बनविणाऱ्याना या समितीच्या महिलांकडून प्रथम विनंती केली जाणार आहे की दारू बनवू नका. त्यानंतरही जर बनावली तर पोलिसांकडे तक्र ार केली जाईल. या वेळी या गावात दारु करणाऱ्यांवर पोलिस निरीक्षकांनी कडक कारवाई केली असे आश्वासन दिले आहे. जर दारु करणाऱ्यांनी ऐकले नाही तर येत्या १५ दिवसात ठिकठिकाणी धाडी टाकल्या जाणार आहेत. या वेळी विक्र मगडचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यानी बोलताना संगीतले की कुंर्झे गावतील महिलांनी दारूबंदी साठीचा प्रयत्न चालू केला आहे तो कौतुकास्पद आहे. यातूनच अनेक संसार वाचणार आसून. विक्र मगड पोलिसाचे सहकार्य नेहमी या महिलांना असेल असे आश्वासन त्यानी या वेळी दिले.
या महिलांचा विशेष सभेत या ग्रामसभेला विजय शिंदे तसेच तराळ मॅडम पं.स. विक्रमगड यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कुंर्झे ग्रा.पं. चे सरपंच सुनिल वाजे, उपसरपंच ज्योती वेखंडे, ग्रा.पं. सदस्य भिमरा मॅडम, गिंभल मॅडम, रिंजड मॅडम, महेश भोईर, पोलिस पाटील विभा गायकवाड, ग्रामविकास अधिकारी विजय पाटील, तंटामक्ती अध्यक्ष बच्यू ठाकरे, टोलूराम चौधरी, हिरामण शेलार, बाबू रिंजड, उमेश दुमाडा, दिलीप काकड या ग्रामस्थ व सर्व महिलांनी कुंर्झे गावात रॅली काढून दारु बंदीच्या घोषणा देवून लोकांमधे दारु बंदी विषयी जनजागृती केली.
ग्रामीण भागात दारु चा वेसनापाई अनेक संसार, तरु ण उध्वस्त झालेत, शासन अनेक योजना राबवतय परंतु दारु चा व्यसनापाई अनेकजण उध्वस्त झाले असून, शासनाने ग्रामीण भागातील दारु बंदी साठी एखादी प्रभावी योजना राबवायला हवी. किवा दारु विक्र ी परवाने देताना कडक निर्बंध घालायला पाहिजे.
-विजय वेखंडे, पंचायत समिती सदस्य, विक्र मगड