शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
2
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
3
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
4
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
5
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
6
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
7
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
8
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
9
India vs Australia PM XI पिंक बॉल प्रॅक्टिस टेस्ट मॅचला 'वनडे' ट्विस्ट!
10
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
11
केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज
12
२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 
13
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
14
"हिंदी सिनेमा करु शकणार नाही असा विचार केला होता", अल्लू अर्जुनने प्रमोशनदरम्यान केला खुलासा
15
अनोखा आदर्श! नवविवाहित दाम्पत्याचा कौतुकास्पद निर्णय; ११ गरीब मुलांना घेतलं दत्तक
16
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
17
"त्याने मला बेडरुममध्ये बोलावलं..." प्रसिद्ध अभिनेत्यावर विनयभंगाचे आरोप; महिलेने केली तक्रार
18
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
19
IPL मधील युवा 'करोडपती' Vaibhav Suryavanshi सचिन-विराटला नव्हे तर या खेळाडूला मानतो आदर्श
20
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर

मिरा-भाईंदर महापालिकेतील कंत्राटींचा पगार झाला दुप्पट

By admin | Published: February 16, 2016 1:49 AM

श्रमजीवी कामगार संघटनेने मिरा-भाईंदर महापालिकेतील २६०० सफाई कामगारांच्या न्याय्य हक्काची लढाई जिंकली असून कामगारांना शासनाच्या २४ फेब्रुवारी २०१५ च्या अधिसुचनेनुसार मा

उसगांव : श्रमजीवी कामगार संघटनेने मिरा-भाईंदर महापालिकेतील २६०० सफाई कामगारांच्या न्याय्य हक्काची लढाई जिंकली असून कामगारांना शासनाच्या २४ फेब्रुवारी २०१५ च्या अधिसुचनेनुसार माहे जानेवारीपासून च्या फरकाच्या रकमेसह यापुढे सफाई कामगारांना किमानवेतन देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसे लेखी पत्र श्रमजीवी कामगार संघटनेला दिले आहे. आता कामगारांना यापुढे दरमहिना रू. ७०००/-च्या ऐवजी रू. १४०००/-किमान वेतन मिळणार आहे. हे श्रमजीवी सफाई कामगारांच्या किमानवेतनासाठीच्या न्याय्य हक्क आंदोलनामधे संघटनेचे अभुतपूर्व यश असल्याचे सांगून संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी बेमुदत संप मागे घेत असल्याचे जाहिर केले व कामगाराना या सत्याग्रह आंदोलनातील विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.श्रमजीवी कामगार संघटना गेले वर्षभर महापालिकेतील सफाई कामगारांच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी संघर्ष करीत आहे. विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली २३ जुलै २०१५ रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय बंगल्यावर सफाई आंदोलन करण्याकरीता गेले होते. त्यावेळी कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी येत्या १५ दिवसांत मुख्यमंत्री हे स्वत: नगरविकासमंत्री असल्याने त्यांच्यासमवेत चर्चा करून संबंधितांना आदेश देण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर काहीही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०१५ रोजी मीरा-भाईंदर महापालिकेत निर्धार सत्याग्रह करत आपली मागणी लाऊन धरली होती. तेव्हाही आयुक्तांनी दोन महिन्यांची मुदत मागीतली होती. ते आश्वासन देखील पूर्ण न झाल्याने ३ फेब्रुवारी २०१६ रोजी किमानवेतनाच्या हक्कासाठी मीरा-भाईंदर महापालिकेतील २६०० कंत्राटी सफाई कामगारांनी एक दिवसाचे लाक्षणिक संप आंदोलन करून कामगारांना किमानवेतन मिळत नाही याकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधून १० फेब्रुवारी पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता.