ठार मारण्याच्या धमकी प्रकरणी आमदार अबू आझमींना जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 12:05 AM2018-10-12T00:05:03+5:302018-10-12T00:07:14+5:30

तलासरी येथील आदिवासी मजुरांचा पगार रोखीत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.

MLA Abu Azmi bail in the case of death threat | ठार मारण्याच्या धमकी प्रकरणी आमदार अबू आझमींना जामीन

ठार मारण्याच्या धमकी प्रकरणी आमदार अबू आझमींना जामीन

googlenewsNext

पालघर : तलासरी येथील आदिवासी मजुरांचा पगार रोखीत त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पालघर अपर व सत्र न्यायालयाने त्यांची १५ हजारांच्या रोख रकमेच्या जामिनावर मुक्तता केली आहे. याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे आझमी यांनी सांगितले.
तलासरी येथील विलाथपाडा येथील सुमारे १०० ते १५० एकर जमीन अबू आझमी, नदीम अहमद आदींनी विकत घेतली होती. या जमिनीच्या सभोवताली भिंत बांधण्याच्या आणि राखावलीच्या कामासाठी डोंगरी, विलाथ पाडा येथील फिर्यादी सितरा थापड, लक्ष्मण डावरे, चंदू थापड, मनू बिलात यांना १ नोव्हेंबर २०१६ पासून कामाला ठेवले होते. दरमहा १६ हजार पगार व रात्रीच्या ड्युटीस दुप्पट पगार ठरविण्यात आला होता. प्रत्येक महिन्यानंतर पगार मागण्यास गेल्यावर पाचशे ते हजार रु पये हातावर टेकवून काम पूर्ण झाल्यावर एकत्र रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन दिले जात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
एक वर्ष काम करून वर्षभराचा पगार दिला जात नसल्याने पगार मागण्यासाठी फिर्यादीसह इतर नोकर ३० आॅक्टोबर रोजी गिरगाव (तलासरी) येथे गेले असता आरोपीने शिवीगाळी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची लेखी तक्र ार फिर्यादी थापड यांनी तलासरी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न केल्याने फिर्यादीने पालघर सत्र न्यायालयात धाव घेतली.

बजावले होते समन्स
या प्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी आरोपी गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने आरोपींना समन्स पाठविले. गुरु वारी या सर्वांनी
पालघर न्यायालयात उपस्थिती दर्शविल्यानंतर त्यांना जामीन मिळाल्याची माहिती आझमी यांचे वकील मोहसीन खान यांनी दिली.

Web Title: MLA Abu Azmi bail in the case of death threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.