वसई-विरारमध्ये न्यू ईअर पार्टीची जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 02:17 AM2018-12-29T02:17:17+5:302018-12-29T02:20:03+5:30
न्यू इयर पार्टीसाठी वसई विरार मधील रिसॉर्ट हे पर्यटकांसाठी खास पर्वणी ठरते. जितकी रिसॉर्टला मागणी आहे तितकाच बंदोबस्त देखील करण्यात आला आहे.
पारोळ/विरार : न्यू इयर पार्टीसाठी वसई विरार मधील रिसॉर्ट हे पर्यटकांसाठी खास पर्वणी ठरते. जितकी रिसॉर्टला मागणी आहे तितकाच बंदोबस्त देखील करण्यात आला आहे. रिसॉर्ट मालक सर्व सुविधा पुरावण्याकरिता सज्ज झालेले आहेत. पर्यटकांनी फार आधीच आॅन लाईन बुकिंग केल्याने सर्वत्र हाऊसफुलले बोर्ड लागले आहेत.
आठवडाभरापासून गर्दी वाढल्याने शहरात चिकन, मटण व मासळीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. १२ नंतर डी. जे वाजवण्यास परवानगी नाही तर अवैध प्रकारे दारू विकणाऱ्यांवर पोलिसांनी आपला वॉच ठेवला आहे.
शनिवार, रविवार सलग आल्यामुळे पार्टीची तयारी जोरात सुरु आहे. ३१ डिसेंबर सोमवारी आल्यामुळे अनेकांनी रविवारी पार्टी करण्यासाठी रिसॉर्टचे बुकिंग करून ठेवले आहे. त्यात पुल पार्टीला सर्वाधिक पसंती देण्यात येत आहे. परवाना असणाºया रिसॉर्टमध्येच मद्यपानाची परवानगी असणार आहे. तसेच, बुकिंग घेतान ओळखपत्र तपासण्यात येत असल्याचे वसई रिसॉर्ट संघटनेचे अध्यक्ष महादेव निजाई यांनी लोकमत ला सांगितले.
पोलिसांचा देखील या दिवशी कडक बंदोबस्त असणार आहे. दारु पिऊन गाडी चालवणाºयांवर कारवाई करण्यात येईल. सगळीकडे नाका बंदी लावण्यात येणार आहे व जास्त वेगाने गाड्या चालवणाºयांना देखील पकडण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. डी. जे वाजवण्यावर देखील बंधन असणार आहे.
गर्दीच्या ठिकाणी, विशेषत: चर्च परिसरात, तसेच समुद्रकिनारी गणवेशधारी पोलिसांसह साध्या वेशातील पोलिस कर्मचारीही गस्त घालणार आहेत. तसेच, ३१ डिसेंबरच्या दिवशी कुठेही बेकायदा पार्ट्या होऊ नयेत, यासाठी करडी नजर ठेवली जाणार आहे. नियम मोडून नववर्षाचे स्वागत केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलिस कर्मचाºयांप्रमाणेच स्वत: प्रभारी अधिकाºयांनीही त्या परिसरात फिरावे, अशा सूचना अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिल्या आहेत. छेडछाडी व सोनसाखळी चोरीच्या घटनांवरही पोलीस लक्ष ठेऊन आहेत.