सूर्या प्रकल्पाचे कालवे ४० वर्षानंतरही अपूर्णच, शासन व लोकप्रतिनिधींकडून उपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 03:11 AM2017-09-19T03:11:47+5:302017-09-19T03:12:26+5:30
जिल्हयातील शेतीला उन्हाळयात पाणीपुरवठा करणारा सूर्या प्रकल्प ४० वर्षानंतरही अपूर्ण अवस्थेत असल्याने संबधित क्षेत्रातील शेतक-यांची घोर निराशा झाली आहे. कालवे तयार करण्यासाठी करोडो रूपयांचा केलेला शासनाचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे जिल्हयातील ग्रामीण भागाला हरीत क्रांतीचे स्वप्न अपूरे राहणार आहे.
शशिकांत ठाकूर ।
कासा : जिल्हयातील शेतीला उन्हाळयात पाणीपुरवठा करणारा सूर्या प्रकल्प ४० वर्षानंतरही अपूर्ण अवस्थेत असल्याने संबधित क्षेत्रातील शेतक-यांची घोर निराशा झाली आहे. कालवे तयार करण्यासाठी करोडो रूपयांचा केलेला शासनाचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे जिल्हयातील ग्रामीण भागाला हरीत क्रांतीचे स्वप्न अपूरे राहणार आहे.
सिंचन हा प्रमुख उद्देश ठेवून सन १९७५ साली कासा जवळील धामणी येथे सूर्यानदीवर धरण बांधण्यात आले व त्याखाली पाणी नदीत व कालव्यात सोडण्यासाठी व नियंत्रणासाठी कडवास हे मातीभरावाचे धरण बांधण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत पालघर ८५२५ हेक्टर, डहणू, ६१४१ हेक्टर विक्रमगड ३० हेक्टर अशी एकूण १६६९६ हेक्टर जमीन ओलीताखाली आणण्यात आली. या सूर्या प्रकल्पासाठी धामणी, सावा, भिवाडी, धरमपूर, कवडास, शेणसरी, तलवाडा आदी गावातील शेकडो कुटुंबे विस्थापित करण्यात आली. व त्याचे पुनर्वसन वाणगांव जवळील चंद्रनगर, हनुमान नगर येथे करण्यात आले. मात्र त्यांनाही अद्याप सर्वच भौतिक सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. तसेच शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी कालवे तयार करण्यात आले व त्यासाठी शेतकºयांच्या जमीनी संपादित करण्यात आल्या मात्र त्यापैकी आंबेदा, बºहाणपूर, सोमटा, चिंचपाडा भागातील काही शेतकाºयांना कालव्यात गेलेल्या जमीनीचा अद्याप मोबदलाही मिळालेला नाही. दरम्यान वनजमीनीच्या अडथळयामुळे डावा तीर मुख्य कालव्याचे सुमारे दिड ते दोन किमी काम अपूर्ण आहे. त्यामुळे सुमारे २२०६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही. त्यामुळे किराट, आलोंडे, फुलपाडा, नागझरी, निहे दामखिंड, वेळगांवा, चरी, गुंदले, करवेले, पांदरे, गिरनोली, पडघे, वारंघडे आदी गावांतील शेतकºयांना अद्याप पाणी मिळालेले नाही. मात्र मुख्यकालव्याचे काम अपूर्ण असतांना गावागावात व शेताकडे जाणारे उपकालवे तयार करण्यात आले आणि पाण्याचा ठावठिकाणा नसतांनाही २० वर्षापूर्वी या कालव्याचे पक्के बांधकाम व दुरूस्तीसाठी लाखो रूपये खर्च करण्यात आले. त्यामुळे कालवे खोदून ४० वर्षे झाली तरी शेतकºयांना पाणीही नाही आणि जमीनीही गेल्या अशी स्थिती झाली आहे. १० वर्षापूर्वी सूर्याकालव्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे कारणपुढे करत सूर्याची सर्व कार्यालये बंद करून ती शहपूर येथील भातसा कालवा क्र. ११ ला जोडण्यात आले मात्र मागील वर्षापासून शेतकºयांनी वारंवार मागणी केल्याने हे कार्यालय पुन्हा मनोर येथे सुरू करण्यात आले. मात्र दुरूस्तीची व साफसफाईची वेळोवेळी कामे न केल्याने कालव्यातून ठिकठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने शेतीला अपूरा पाणी पूरवठा होत आहे.
सूर्या प्रकल्पाचे काम आदिवासी विकास विभागाच्या निधीतून झाले आहे. त्यामुळे त्याचा लाभ येथील शेतकºयांना झाला पाहिजे आणि प्रकल्पाचे काम अपूर्ण असतांना बाहेर पाणी देवू नये.
-राजेंद्र गावित, माजी राज्यमंत्री