शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यातील पहिला निकाल जाहीर: महायुतीची लाडकी बहीण जिंकली; आदिती तटकरेंचा विजय निश्चित
2
Maharashtra Assembly Election Result 2024: करेक्ट कार्यक्रम! महाविकास आघाडीला केवळ ५१ जागांवर आघाडी; पवार-ठाकरेंची सहानुभूती संपली?
3
Maharashtra Assembly Election 2024 Result Worli Vidhansabha: वरळीत मोठा धक्का! आदित्य ठाकरे पाचव्या फेरीअखेर पिछाडीवर, आघाडीवर कोण?
4
Nanded Lok Sabha By Election Results 2024: नांदेडमध्ये काँग्रेसची जागा धोक्यात, भाजपला किती मताधिक्य?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: "महायुतीच्या विजयात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा, ऊर बडवण्याशिवाय..."; नेत्यांनी उडवली खिल्ली
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर, मनसेची संतप्त टीका; नेते म्हणाले, “भाजपाने शब्द फिरवला...”
7
Maharashtra Assembly Election 2024 Result : चंद्रकांत पाटलांचं उद्धव ठाकरेंबद्दल मोठं वक्तव्य; म्हणाले, "ते सोबत येणं हा..."
8
Vikhroli Vidhan Sabha Election Result 2024 Live : विक्रोळीत पुन्हा एकदा राऊतांचीच हवा, हॅटट्रिक साधणार?; ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर
9
"कुछ तो गडबड है, हा कौल कसा मानावा?’’ संजय राऊत यांनी निकालावर व्यक्त केली शंका
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंचा लागतोय कस, एकनाथ शिंदे ठरतायत सरस! असा आहे आतापर्यंतचा कल
11
Nanded Loksabha ByPoll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काय घडतेय? भाजप की काँग्रेस आघाडीवर...
12
Kolhapur Vidhan Sabha Election Result 2024 Live : कोल्हापुरात कोणत्या मतदारसंघात कोणाची आघाडी? जाणून घ्या प्रत्येक अपडेट...
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीची जोरदार मुसंडी, ठोकलं द्विशतक; मविआची मोठी पिछेहाट, असं आहे आतापर्यंतचं चित्र
14
Maharashtra Assembly Election Results : सुरुवातीच्या कलात काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर!
15
Wayanad By Election Result 2024: प्रियांका गांधींची विजयाच्या दिशेने कूच! पहा आकडेवारी
16
Mankhurd Shivaji Nagar Vidhan Sabha Election Result 2024 : नवाब मलिक पराभवाच्या छायेत?; राष्ट्रवादी २४ हजार मतांनी पिछाडीवर
17
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजपाची शतकी खेळी, शिंदेसेनेची हाफ सेंच्युरी; मविआची पिछेहाट, महायुतीची मुसंडी
18
Karad North Vidhan Sabha Election Result 2024 Live : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; शरद पवारांचा शिलेदार ७३४४ मतांनी पिछाडीवर
19
Maharashtra Assembly Election 2024 Result : आशिष शेलारांच्या भावाकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार अस्लम शेख यांना टफ फाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर

पालघरच्या खासदाराचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:28 AM

मतदारराजाचा फायनल कौल कळणार । सकाळी ८ पासून सुरू होणार मतमोजणी । कोणाच्या विजयाचा होणार जल्लोष?

पालघर : या लोकसभा मतदारसंघात एकूण १२ उमेदवार असून भाजप-सेनेचे राजेंद्र गावित आणि बविआ-महाआघाडीचे बळीराम जाधव यांच्यात सरळ लढत होणार आहे. बळीराम जाधव हे २००९ च्या निवडणुकीत तर राजेंद्र गावित २०१८ च्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. दोघांपैकी जिंकणाऱ्यांची ही दुसरी टर्म असणार आहे.

लोकसभा मतदार संघातील पालघर विधानसभा मतदार संघ शिवसेनेकडे असून डहाणू व विक्रमगड मतदार संघ भाजपकडे आहेत तर उर्वरीत बोईसर, नालासोपारा व वसई हे तीन मतदार संघ बहुजन विकास आघाडी कडे आहेत. २०१८ च्या पोटनिवडणुकीत सेना, भाजप व बहुजन विकास आघाडी हे तिघेही स्वतंत्र लढले होते. आता सेना-भाजप, रिपाई, श्रमजीवी आदी एकत्र असून महायुतीचे राजेंद्र गावित तिचे उमेदवार असून बविआने काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप, दलित पँथर आदीची महाआघाडी निर्माण केली असून तिच्या वतीने बळीराम जाधव निवडणूक लढवित आहेत. बहुजन विकास आघाडीकडून त्यांचे शिट्टी हे चिन्ह काढून घेण्यात सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांना यश आल्यानंतर बविआच्या अध्यक्षासह पदाधिकारी, कार्यकर्ते आतून पेटून उठले होते. शिट्टी ऐवजी मिळालेले रिक्षा हे चिन्ह ग्रामीण भागातील मतदारपर्यंत पोहचविण्यात बविआचे कार्यकर्ते पूर्णपणे यशस्वी झालेले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढवल्या होत्या.मतमोजणी प्रक्रिया अशी असेलपालघर: गुरुवारी (२३ मे) रोजी पालघर सूर्या प्रकल्प कार्यालयानजीक असलेल्या शासकीय गोदाम क्र.२ मध्ये मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे. केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) सुरक्षिततेखाली स्ट्रॉंगरूमची भिंत तोडून मतमोजणी केंद्रात सर्वाना प्रवेश दिला जाणार आहे.अशी असेल मतमोजणीवर देखरेखदोन निरीक्षकाच्या देखरेखी खाली व निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या अधिपत्त्याखाली मतमोजणीचे काम पार पडेल. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी व सहा.निवडणूक अधिकारी यांच्याकडे सुविधा व सीडीएम असे सॉफ्टवेअर उपलब्ध असेल.

भिंत फोडून मतदानयंत्रे काढणारसकाळी ६ वाजता प्रथम मतदान यंत्रे ठेवलेल्या व त्रिस्तरीय सुरक्षा बंदोबस्त व्यवस्था पुरविण्यात आलेल्या स्ट्रॉंगरूमची उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी समक्ष तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी झाल्यानंतर तेथे तैनात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) सुरक्षिततेखाली स्ट्रॉंगरूमची भिंत तोडून मतमोजणी केंद्रात सर्वाना प्रवेश दिला जाणार आहे. ही भिंत फोडल्यानंतर तेथून आखून व ठरवून दिलेल्या मार्गाने स्ट्रॉंग रूममधील मतदान यंत्रे सहा वेगवेगळ्या मतदान कक्षात आणली जातील. यावर सीसीटीव्ही व वेब कास्टिंगची देखरेख असेल. यानंतर ही मतदान यंत्रे मतमोजणीच्या ठिकाणी नेली जातील. यावेळी मतदान मोजणी प्रक्रि येला सुरुवात करण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाºयांना गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे.

विधानसभा मतदार संघनिहाय प्रत्येकी १४ टेबल्सबरोबर ८ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरु वात करतांना सहा विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी १४ टेबल्सनिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. नालासोपारा मतदार संघात सर्वाधिक ३५ तर पालघर मतदार संघात सर्वात कमी २३ फेºया होणार आहेत. तर डहाणूमध्ये २४ तर बोईसर आणि वसईमध्ये प्रत्येकी २५ फेºया राहणार आहेत. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलनिहाय पर्यवेक्षक, सहाय्यक पर्यवेक्षक, सूक्ष्म निरीक्षक असे अधिकारी असणार आहेत.प्रारंभी टपाल मतपत्रिका व इटीपीबीएसची मोजणी केली जाईल. यापूर्वीच्या मतमोजणीवेळी ही मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच मतमोजणीचे काम सुरु होत असे. या वेळी मात्र टपाल मतपत्रिकेच्या मतमोजणी बरोबरीनेच प्रत्यक्ष मतमोजणीही सुरू होईल. प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ५ मतदान केंद्राच्या व्हीव्हीपॅटमधील मतांची मोजणी देखील यावेळी होणार आहे.एका व्हीव्हीपॅट मोजणीला ४५ मिनिटे ते एक तासाचा अवधी लागणार असल्याने सहा विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी ५ अशा ३० व्हीव्हीपॅट मधील स्लिपची मोजणी करण्यास २५ ते ३० तासाचा अवधी लागल्यास निकाल घोषित करण्यास दुसरा दिवस उजाडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदानानंतर मतदान प्रतिनिधींना नमुना नं.१७ मध्ये झालेल्या मतदानाविषयी दिलेली आकडेवारी व मतदान यंत्राद्वारा बाहेर आलेली त्या-त्या केंद्राची झालेली मतदानविषयक आकडेवारी यात तफावत आढळल्यास निवडणूक आयोगाकडे या संबंधीची माहिती दिली जाईल व निवडणूक आयोगाकडून हिरवा कंदील मिळाल्या नंतरच संबंधित केंद्रासंबंधीची पुढील प्रक्रिया सुरू होईल.या उमेदवारांच्या निकालाकडे साºयांचे लक्षराजेंद्र गावित । सेना/भाजपा महायुती : राजेंद्र गावित यांनी पालघर विधानसभा मतदारसंघात २००४ साली प्रथम काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. त्यावेळी त्यांचा पराभव झाला. त्या नंतर २००९ च्या निवडणुकीत त्यांनी सेनेच्या उमेदवार मनीषा निमकर यांचा पराभव केला. त्यांना आदिवासी विकास राज्यमंत्री पद मिळाले. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवतांना त्यांना सेनेचे कृष्णा घोडा यांच्याकडून अल्प मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. माजी आमदार कृष्णा घोडा यांच्या अकाली निधनाने २०१६ साली झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पुन्हा पराभव झाला. भाजपचे खासदार चिंतामण वणगा यांच्या मृत्यूमुळे घ्याव्या लागलेल्या पोटनिवडणूकीत ते विजयी झाले. या निवडणुकीत मात्र युतीच्या गणितात शिवसेनेने पालघर आपला दावा सांगून उमेदवारी मिळवली. उद्धव ठाकरेंनी गवितांना सेनेकडून उमेदवारी दिली.

बळीराम जाधव । बविआ : बळीराम जाधव यांची राजकीय कारकीर्द १९७६ पासून सुरुवात झाली असून ते सायवन (वसई) ग्रामपंचायतीचे सरपंच होते. १९९७ साली ते वसई पंचायत समितीचे सभापती झाले. १९९८ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर पालकमंत्री विष्णू सवरांच्या विरोधात वाडा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. तसेच २००४ ते २००९ अशी पाच वर्षे वसई कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक होते. २००९ मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक बहुजन विकास आघाडीच्या ‘शिट्टी’ चिन्हावर लढवून ते विजयी झाले. त्यानंतर झालेल्या २०१४, २०१८ साली झालेल्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते.

टॅग्स :palghar-pcपालघर