मेवाणींना रोखणाऱ्यांनाच ‘खो’, पोलिसांकडून हिंदुत्ववाद्यांना जमावबंदीची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 02:24 AM2018-12-29T02:24:32+5:302018-12-29T02:25:06+5:30
पर्यावरण संवर्धन समितीतर्फे शुक्र वारी वसईमध्ये पर्यावरण मेळावा २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रमूख वक्ते म्हणून गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांना बोलावण्यात आले.
वसई - पर्यावरण संवर्धन समितीतर्फे शुक्र वारी वसईमध्ये पर्यावरण मेळावा २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रमूख वक्ते म्हणून गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांना बोलावण्यात आले. मात्र मेवानी यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्य होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांना चार दिवसांपूर्वी निवेदन देणा-यांनाच पोलिसांनी जमावबंदीच्या नोटीसा काढल्या आहेत.
एमएमआरडी आराखडा, बुलेट ट्रेन, सागरी महामार्ग, मुंबई-बडोदरा एक्सप्रेस वे, समुद्र किनारे व्यवस्थापन आराखडा, वाढवण बंदर आदि प्रकल्पांविरोधात पर्यावरण समितीतर्फे पर्यावरण संवर्धन मेळावा -२०१८ चे आयोजन करण्यात आले होते. शुक्र वारी संध्याकाळी ४ वाजता वाय.एम .सी. ए. मैदान, माणिकपूर, वसई रोड येथे हा मेळावा घेतला गेला. या मेळाव्यात गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी सह आदिवासी एकता परिषदेचे काळूराम धोदडे, जेष्ठ साहित्यक व हरीत वसईचे प्रणेते फादर फ्रान्सिस दिब्रीटो, जेष्ठ नगररचनाकार चंद्रशेखर प्रभू आदी मान्यवरांनाही आमंत्रित करण्यात आले होते.
मेवानी यांची भाषणशैली ही चिथावणीखोर असल्यामुळे तसेच पुणे एल्गार परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. वसई येथील कार्यक्रमाप्रकरणी समज द्यावी, यासाठी निवेदन देऊन पोलिसांना सहकार्य करणाºया हिंदुत्विनष्ठांनाच पोलिसांनी जमावबंदीची नोटीस काढल्यामुळे वसईत संताप व्यक्त होत आहे.
पुणे येथील एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा दंगल पेटली होती. या एल्गार परिषदेत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेले गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी वसईत पर्यावरण संवर्धन समितीच्या मेळाव्यात वादग्रस्त विधान करून वातावरण बिघडवू नये, यासाठी वसईतील काही संघटनांच्या वतीने २५ डिसेंबरला नवघर पोलीस ठाण्यात निवेदन दिले होते. मात्र ते निवेदन देणाºयांनाच पोलिसांनी जमावबंदीची नोटीस बजावून गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी माणकिपूर पोलीस ठाण्याकडून ८ जणांना जमावबंदीची नोटीस देण्यात आली आहे. पोलिसांनी मात्र आंम्ही आयोजकांनाही नोटीसा बजावल्याचे सांगितले.
या प्रकरणी राष्ट्र प्रथम चे शिवकुमार पांडे, हिंदू गोवंश रक्षा समितीचे दीप्तेश पाटील, मातृभूमी प्रतिष्ठानचे जीतेंद्र हजारे, साईनाथ मित्रमंडळाचे योगेश सिंग, आपोळे गणेश मंदिराचे नीलेश खोकाणी, विश्व हिंदू परिषदेचे लक्ष्मण गिसंग, बजरंगदलाचे राजेश पल, जय महाकाल ट्रस्टचे चंद्रशेखर गुप्ता यांना ये नोटीस पाठवण्यात आली आहे. तर आयोजक म्हणून समीर वर्तक यांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे.
सदर नोटीसांमध्ये, अनुचित प्रकार करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपल्या संघटनेचे पदाधिकारी अथवा सदस्य यांना उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. असे नमूद करण्यात आले आहे.
पर्यावरण संवर्धनक्षेत्रात कोणतेच योगदान नसतांना जिग्नेश मेवाणी यांना निमंत्रण कशासाठी? असा प्रश्न या संघटनांनी उपस्थित केला आहे. वसई येथील पर्यावरणाची स्थिती पहाता, याठिकाणी पर्यावरण संवर्धन मेळावा होणे आवश्यकच आहे. मात्र, या मेळाव्याच्या प्रमुख वक्तेपदी जिग्नेश मेवाणी यांना बोलावण्याचे नेमके कारण काय? मेवाणी यांचा पूर्व इतिहास पहाता त्यांच्या बेलगाम वक्तव्यातून जातीय, धार्मिक आणि प्रांतीय तेढ निर्माण होऊ शकते. कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी मेवाणी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांचे पर्यावरण संवर्धनक्षेत्रात कोणत्याही प्रकारे योगदान नसतांना त्यांना या कार्यक्र माला बोलवण्यामागे जातीय तेढ निर्माण करण्याचा हेतू तर नाही ना? याची कसून अन्वेषण करून तसे आढळल्यास जिग्नेश मेवाणी आणि आयोजक यांना योग्य ती समज देण्यात यावी असे निवेदनात सांगण्यात आले आहे.
काय आहे नोटीस संघटनांकडून निषेध
पोलिसांनी दिलेल्या नोटीसमध्ये, कार्यक्रमात अनिधकृतपणे कोणताही अडथळा निर्माण केल्यास किंवा नागरिकांना कोणताही त्रास झाल्यास, तसेच आपणाकडून अथवा आपल्या संघटनेचे पदाधिकारी अथवा सदस्यांकडून त्रास होऊ नये या बाबत दक्षतेची सूचना आहे.
मात्र, असे कोणतेही कृत्य केल्यास, कायदा आणि सुव्यवस्था यांचा
प्रश्न निर्माण झाल्यास आपल्या संघटनेचे पदाधिकारी अथवा सदस्य यांना उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
या पर्यावरण संवर्धन मेळाव्यासाठी खबरदारी म्हणून निवेदन देणाºयांना व आयोजकांनाही फौजदारी दंड प्रक्र ीया संहिता कलम १४९ प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या आहेत. ५० पोलिस व १० अधिकारी बंदोबस्तासाठी आहेत.
-दामोदर बांदेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, माणिकपूर पोलिस ठाणे