अवकाळी पावसाचा फटका; राजेंद्र गावित यांनी केली भातशेती नुकसानीची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 11:16 PM2019-10-29T23:16:05+5:302019-10-29T23:16:48+5:30
नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे करण्याचे आदेश
कासा : डहाणू तालुक्यातील गावामध्ये परतीच्या पावसाने भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून खासदार राजेंद्र गावित यांनी रविवारी त्याची पाहणी केली. यावेळी शेतात पाणी भरले असल्याने खा. गावितांनी चक्क चिखलात उतरून शेतीची पाहणी केली.
खा. गावित यांनी कृषी आणि महसूल अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील कासा भागातील वाघाडी, धरमपूर, बांधघर, ओसरवीरा, धानिवरी आदी गावातील नुकसानग्रस्त भातिपकाची पाहणी केली. भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त भात शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश कृषी तसेच महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले. दरम्यान, शेतकºयांना शासनाकडून हेक्टरी १३ हजार ५०० एवढी भरपाई दिली जात असून ही खूप कमी आहे. तसेच बºयाच शेतकºयांच्या शेतजमिनी या एक हेक्टरपेक्षा कमी आहेत. त्यांच्या भात शेतीचे पूर्ण नुकसान झाले असतांना केवळ त्यांना २ ते ३ हजार नुकसान मिळते.
परतीच्या पावसाने भाताची कडपे भिजून गेली आहेत. वादळाने पीक खाली कोलमडून पडली आहेत. तसेच पिकांच्या दाण्याना नवीन कोंब फुटले आहेत. दरम्यान, मधल्या काळात पाच - सहा दिवस उघाडी मिळाल्याने तयार झालेल्या भात कापणीस सुरु वात केली. मात्र पुन: सतत पाच दिवस पाऊस सुरूच राहिल्याने बर्याच शेतकºयांची कापलेली पिके आठवडाभर शेतातच राहिल्याने कुजून गेली आहेत. आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत पाऊस सुरू राहिल्याने भात कापणीची कामे करता येत नाही. ढगाळ वातावरणामुळे शेतातील भाताच्या दाण्यावर बुरशी चढली आहे. त्यामुळे दाणे काळे पडले आहेत. त्यामधून येणारा तांदळाचे तीन चार तुकडे होतात. तसेच भाताच्या मळणी नंतरच्या पावलीचा दर्जा खालावला आहे. पावली काळी पडल्याने ती गुरांसाठी विक्री आणि साठा करण्याच्या लायक राहिलेली नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकºयांनी शासनाकडून हेक्टरी ४० हजार रु पये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी खा. गावित यांच्याकडे केली. यावेळी खासदार गावित यांनी नुकसानीची परिस्थिती लक्षात घेता जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकºयांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी कासा मंडळ अधिकारी संदीप संखे, शेतकरी उपस्थित होते.
१५ हजार ६७ हेक्टर लागवड क्षेत्र
डहाणू तालुक्यात एकूण १५ हजार ६७ हेक्टर लागवड क्षेत्र आहे यामध्ये १४ हजार ८३४ हेक्टर भात लागवड क्षेत्र असून १९५ हेक्टर खुरासनी, ३८ हेक्टर नागली, १९५ हेक्टर उडीद लागवड क्षेत्र आहे.