जव्हार नगरपालिकेच्या व्यायामशाळेची दुर्दशा

By admin | Published: October 25, 2016 03:21 AM2016-10-25T03:21:21+5:302016-10-25T03:21:21+5:30

एसटी बसस्थानका समोरील नगपरिषदेच्या ग्राऊंडमध्ये असलेल्या व्यायामशाळेची दुर्दशा झाली असून, मोडकळीस आलेल्या जीवघेण्या इमारतीत तरुणाईला व्यायाम करावा लागतो आहे.

Plight of Javar Municipality's gym | जव्हार नगरपालिकेच्या व्यायामशाळेची दुर्दशा

जव्हार नगरपालिकेच्या व्यायामशाळेची दुर्दशा

Next

जव्हार : एसटी बसस्थानका समोरील नगपरिषदेच्या ग्राऊंडमध्ये असलेल्या व्यायामशाळेची दुर्दशा झाली असून, मोडकळीस आलेल्या जीवघेण्या इमारतीत तरुणाईला व्यायाम करावा लागतो आहे.
या व्यामशाळेच्या भिंतीला तडा जाऊन ती कोसळण्याची शक्यता आहे. एका बाजूची भिंत कधीच कोसळली आहे. आणि दरवाजे, खिडक्या मोडकळीस आले आहेत. इमारतीवरील पत्रे फुटले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात व्यामशाळेची इमारत गळकी होते. व्यायाम करायाला येणाऱ्या तरूणांनी वर्गणी गोळा करून पावसाळ्यात इमारतीवर प्लॅस्टिक टाकले होते. अशी अवस्था दरवर्षी होते. त्यामुळे व्यायाम करणाऱ्या तरुणांना नाराजी व्याक्त केली आहे.
व्यायामसाठी काही तरूणांना पहाटे ४.३० वाजता यावे लागते, मात्र या व्यायामशाळेत, जिममध्ये लाईट नसल्याने अंधारात चाचपडत व्यायाम करावा लागत आहे. व्यायाम शाळेच्या पुढील बाजूने हॉटेल असल्याने गटारीचे खराब पाणी या व्यायामशाळेच्या समोरून वाहत असते, त्यामुळे व्यायामशाळे समोर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जव्हार या भागातील तरूणांनी यापूर्वी या व्यायाम शाळेची नवीन इमारत बांधून द्यावी, अन्यथा याच इमारतीची दुरूस्ती करावी अशी मागणी केली आहे. मात्र याकडे जव्हार नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाल्याचे तरुणांनी सांगितले. त्यामुळे नगरपरिषदेने या व्यायाम शाळेची दुरुस्तीची मागणी केली आहे.
नगरपरिषदेला हे शक्य नसेल तर येथील आमदार, खासदार यांनी आपल्या स्थानिक परिसर विकास निधीतून त्यासाठी निधी द्यावा व हे काम पूर्ण करून घ्यावे अशी मागणी येथील तरुणांनी केली आहे.
(वार्ताहर)

Web Title: Plight of Javar Municipality's gym

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.