ठाणे: शासनाने दारु विक्री परवाधारकांना निकष लावल्याने दारु विक्रीवर मर्यादा आल्या होत्या, मात्र आता पुन्हा अधिकृत परवाना धारकांना विक्री करण्याचे आदेश दिलेले आहेत़ परंतु येथे बिअरशॉपीच्या नावाखाली अनाधिकृतपणे दमण बनावटीची दारू सर्रास पणे विकली जात असून हे बिअरशॉप धारक किरकोळ विक्रीसह घाऊक विक्री देखील करीत असल्याने तालुक्यातील अनेक गाव-पाडयात ही दारु विक्रीसाठी जात आहे़.महाराष्ट्र राज्यातील दारुच्या तुलनेत ही दमण बनावटीची दारु स्वस्त असल्याने विक्रमगड शहर व तालुक्यातील अनेक महाविद्यालयीन तरुण यास बळी पडत आहेत. हा व्यवसाय विक्रमगडमध्ये खुलेआम सुरु असून पोलिसांनी काही वर्षात या विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केल्यांनतर त्यांनी तिनदा कारवाई करुन किरण वाडाण व सुरेश वाडाण यांचेवर कारवाई केली होती. मात्र, या संदर्भातील खटला न्यायालयात प्रलंबित असतांना सदर ठिकाणी अवैध दारुची विक्री सर्रास सुरु आहे.शहरापासून काही किमी अंतरावर साखरे नाक्यावर किराणा दुकानामध्ये तसेच उपराळे येथे बिअरशॉपच्या दुकानातून ही दारु विकली जात आहे़ तसेच शहरामधील नाक्या नाक्यावर या दारुची विक्री सुरु आहे. विक्रमगड हायस्कुलपासून शंभर मीटर अंतरावर चायनिज दुकाने असून त्याच्या पाठीमागे दमन बनावटी दारु पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ मनोर रस्ता हा सुद्धा दारु विक्रीचा महत्वाचा पॉर्इंट आहे. मुख्य बाजारामध्ये लकी मध्ये देखील या दारुची खुलेआम विक्री होतांना दिसत आहे़ इतर खेडयापाडयात व छोटया दुकानदारांना देखील याच बिअर शॉपीमधून माल पुरविला जात असल्याचे छोटे व्यवसाय विक्रीकरणाºयांनी लोकमतला सांगितले. तसेच पाटीलपाडा नाक्यावर असलेल्या बिरशॉमध्ये देखील हाच प्रकार सुरु आहे. एकंदरीत बिअर शॉपच्या परवान्याखाली या बनावट दारुची जोमात विक्री होत असल्याचे वृत्त आहे़
दमणदारुमुळे तरुणाई व्यसनाधीन, विक्रमगडमध्ये पोलिस चिडीचूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 1:30 AM