मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:16 PM2019-05-21T23:16:38+5:302019-05-21T23:16:40+5:30

कडेकोट सुरक्षा व्यवस्था : १६०० अधिकारी, कर्मचारी, पोलीस तैनात

Prepare the machinery for counting | मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

Next

पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघासाठक्ष झालेल्या मतांची मोजणी येथील सूर्या कॉलनी, शासकीय गोदाम क्र . २ येथे २३ मे रोजी होणार असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

 


या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक गौरव सिंग, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, उपस्थित होते. मतमोजणी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत होणार असून पोलीस व इतर सुरक्षा दलाच्या जवानांसह सुमारे १ हजार ६०० अधिकारी- कर्मचारी मतमोजणी यशस्वीरीत्या पार पाडण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.


सहा विधानसभा मतदारसंघ निहाय होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल असणार आहेत. नालासोपारा मतदारसंघात सर्वाधिक ३५ आणि पालघर मतदारसंघात सर्वात कमी २३ फेºया होतील. याशिवाय डहाणू मतदारसंघात २४ तर विक्र मगड, बोईसर आणि वसई मतदारसंघात प्रत्येकी २५ फेºया होतील. मतमोजणीची रंगीत तालिम मंगळवार दि २१ मे रोजी घेण्यात आली.


पालघर लोकसभा मतदारसंघासाठी विक्र मगड, पालघर, डहाणू, बोईसर, नालासोपारा, वसई अशा सहा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण १८,८५,२९७ मतदारांपैकी १२,०१,२९८ मतदारांनी मतदान केले आहे. मतदानाची टक्केवारी ६३.७२ इतकी आहे. मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू केली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबल निहाय आराखडा तयार करण्यात आलेला आहे.

मतमोजणीसाठी अधिकारी कर्मचारी तैनात
मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलिनहाय पर्यवेक्षक, सहा. पर्यवेक्षक, सुक्ष्म निरीक्षक असे अधिकारी असणार आहेत. या व्यतिरिक्त संगणक कामासाठी, इव्हीएम स्ट्राँगरूममधून आणणे, त्यांची सुरक्षा, टपाली मतिपत्रका मतमोजणी सुक्ष्म निरीक्षक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विविध समित्यामधील कर्मचारी जबाबदारी सांभाळणार आहेत.आयोगाच्या निकषानुसार स्ट्राँग रु मला त्रिस्तरीय सुरक्षा बंदोबस्त व्यवस्था पुरविण्यात आलेली आहे.याशिवाय प्रत्येक मतदारसंघातील मतमोजणी पथकाला विशिष्ट रंगाचे टीशर्टस तसेच बॅजेस देण्यात येणार आहेत जेणे करून कुठलाही संभ्रम होणार नाही.

मतमोजणी केंद्र येथे कडक पोलीस बंदोबस्त असून मतमोजणीच्या दिवशी देखील अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करावयाचे आहे.

मोबाईल वापरावर बंदी
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि २३ मे रोजी मतमोजणी केंद्र परिसरात उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणी अधिकारी, कर्मचारी यांना मोबाईल फोन, लॅपटॉप आदी आणता येणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Prepare the machinery for counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.