तलाठ्याला मारहाण : जुन्नरचे आमदार सोनावणेंचा काळ्या फितींद्वारे निषेध
By admin | Published: February 16, 2016 01:50 AM2016-02-16T01:50:52+5:302016-02-16T01:50:52+5:30
जिल्हा पुणे तलाठी सजा अने येथील तलाठ्याला आपल्या निवासस्थानी बोलावून रेतीमाफीयांना पाठीशी घालणाऱ्या आ. सोनावणे यांनी मारहाण केल्याप्रकरणी पालघर
मनोर : जिल्हा पुणे तलाठी सजा अने येथील तलाठ्याला आपल्या निवासस्थानी बोलावून रेतीमाफीयांना पाठीशी घालणाऱ्या आ. सोनावणे यांनी मारहाण केल्याप्रकरणी पालघर जिल्हा तलाठी संघ व नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी यांनी काळ्या फिती लावून त्यांचा निषेध केला. सोनावणेंची आमदारकी रद्द करावी त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले.
यापूर्वी देखील वेळोवेळी अशाच प्रकारचे वाळु तस्करींकडून तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांना दम भरणे, मारहाण करणे त्यांच्या अंगावर गाडी घालणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाचा कणा म्हणून काम करीत असलेले महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे मानसिक खच्चीकरण होते आहे. अशा वाळुमाफीयांना पाठीशी घालून आमदार शरद सोनावणे यांनी लोकशाहीला काळीमा लागेल असे कृत्य केले आहे. त्यावर एमपीडीऐ कायद्यानुसार कार्यवाही व्हावी. सोनावणे यांचे आमदारपद रद्द करावे, अशी मागणी पालघर जिल्हा तलाठी संघ व नायब तहसिलदार, महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी मुख्यालय पालघर येथे काळ्या फिती लावून आमदारांचा निषेध केला व निवेदन सादर केले. यावेळी अध्यक्ष केशव तरंगे, चिटणीस समीर राणा, चौधरी नेहरूलकर, अजय भोये, नायब तहसिलदार परदेशी मॅडम, संखे इतर महसूल कर्मचारी उपस्थित होते.