तलासरीचा अपवाद वगळता संपूर्ण पालघर जिल्ह्याला गेले ४८ तास मुसळधार पावसाने झोडपून काढले, यात ७ जणांचे बळी गेले असून एक जण बेपत्ता झाला आहे. समुद्रात आलेल्या वादळाने शेकडो मच्छीमार बोटींची हानी झाली असून अनेक घरे, विजेचे खांब, वृक्ष कोसळले आहेत. नालासोपारा येथील लोहमार्ग पाण्याखाली होता. या पावसाचा सर्वाधिक फटका वसई, नालासोपारा, विरार या शहरांना बसला आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेले भात आणि नागलीचे पीक वाया गेले आहे. तर नवरात्रोत्सवाच्या पूर्वतयारीवरही पाणी पडले आहे. पाऊस उद्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नद्या व धरणांच्या परीसरात राहणाºया जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे.पालघर : जिल्ह्यात रात्रभर सुरु असलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे झाडे उन्मळून घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल असून डहाणू तालुक्यातील आंबोली गावातीळ ६० घरांचे नुकसान झाले. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. अनेक झाडे उन्मळून विद्युत वाहक तारा वर पडून ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा अनेक तास बंद पडला होता. ह्या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.नवनाथ जरे ह्यांनी दिली.जिल्ह्यात एकूण सरासरी २२८.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक पाऊस वसई येथे ३४७ मिमी, मोखाडा १७२ मिमी,विक्र मगड १८४ मिमी,वाडा १६३ मिमी, तलासरी १३७.५ मिमी, डहाणू २३७ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. किनारपट्टी लगत गावे आणि बागायती क्षेत्रांना कालच्या वादळाचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. काल पासून सुमारे १८ तास जिल्ह्यातील विजपुरवठा पूर्णपने खंडित करण्यात आला होता. तो आज दुपारी सुरू झाला. काल रात्री पासून धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाचे तीन दरवाजे दीड फुटाने उघडण्यात आले होते.तर दोन दरवाजे दोन फुटाने उघडून ९ हजार ६०० कुसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.तर कवडास धरणातून १६ हजार ५०० कुसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे.कालच्या पावसामुळे पश्चिम रेल्वेला मोठा फटका बसला असून पनवेल-डहाणू मेमु रद्द करण्यात आली. चाकर मान्यांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने मागून येणाºया लोकशक्ती एक्स्प्रेस ला डहाणू पर्यंत थांबा दिला. मात्र डहाणू थर्मलपॉवर येथे ओव्हर हेड वायर मध्ये बिघाड झाल्याने सर्वच गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. पालघर ला रात्री ८-१५ वाजता येणारी वलसाड पॅसेंजर सुमारे चार तास उशिराने धावत असल्याने आज ही गाडी रद्द करण्यात आली. त्याबरोबरच मुंबईतून गुजरात कडे जाणाºया गुजरात एक्स्प्रेस, सौराष्ट्र एक्स्प्रेस, सुरत इंटरिसटी, शताब्दी एक्स्प्रेस, सकाळची डहाणू-पनवेल मेमुही रद्द करण्यात आली. ह्यावेळी लोकलगाड्याही उशिराने धावत होत्या. आजही मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने चाकरमान्यांनी घरीच राहणे पसंद केले.शिरगाव (राम पाडा) येथील २५ घरे वादळी वार्याने उध्वस्त झाल्याने तहसीलदार महेश सागर ह्यांनी स्वत: भेट देऊन तर अक्करपटी येथील १०० बधितांच्या निवाºयाची व्यवस्था करीत त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. डहाणू तालुक्यातील आंबोली गावाला चक्रीवादळाचा तडाखा बसून झाडे ६० घरावर कोसळून मोठे नुकसान झाले. खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे, जिल्हापरिषद अध्यक्ष विजय खरपडे ह्यांनी बधितांना भेट दिली.चिंचणी भागात ३१५ मिमी पावसाची नोंद झाली बागायदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बावडा येथील बागायदार चुरी यांच्यासह अनेक बागायतदारांच्या वाडीतील चीकू, आंबा, नारळ, केळी, भोपळा मिर्ची यांची झाडे तसेच शेडनेट कोलमडुन पडली. अजूनही नुकसानीचे पंचनामे करण्यात न आल्याने त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी शेतकºयांकडून होते आहे. मंगळवारी रात्री पासून धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरणाचे तीन दरवाजे दीड फुटाने उघडण्यात आले होते.तर दोन दरवाजे दोन फुटाने उघडून ९ हजार ६०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.तर कवडास धरणातून १६ हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.।बोईसर व तारापूरला पावसाचे थैमानबोईसर : मंगळवारी संध्याकाळी प्रचंड वीज, गडगडाटासह सुरू झालेल्या मुसळधार पाऊसाने अल्पावधीत रौद्ररूप धारण करून अक्षरश: हाहाकार माजवला. बोईसर पूर्वेकडे पुलावरून वाहणाºया पाण्यातून जाणाºया चार पैकी एकाचा पुरात वाहून जाऊन मृत्यू झाला तर त्याच्या तीन साथीदारांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. त्याच प्रमाणे पोफरण येथील घरांचे पत्रे उडून पडझड झाली. बोईसरला अल्पावधीत पडलेल्या २५१ मि.मी. पावसाचा निचरा न झाल्याने बोईसरच्या सिडको वसाहतीतील बैठया चाळीतील शेकडो घरांमध्ये सुमारे तीन ते चार फूट पाणी शिरले होते. तर बोईसर पूर्वेकडील दांडिपाडा ते लोखंडी वाडा या दोन गावांना जोडणाºया पुलावरु न पाण्याचा प्रवाह प्रचंड प्रमाणात वाहत असताना त्या मध्ये चार जणांनी त्यातून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात रबिउल्लाशाह हा वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. तारापूर अणुऊर्जा केंद्र तीन व चार च्या प्रकल्प ग्रस्तांचे पुनर्वसन केलेल्या पोफरण गावातील काही घरांचे पत्रे उडून घरांची पडझड झाली तर झाडे कोसळून नुकसान झाले काही घरातील जीवनावश्यक सामान व भांडी वाहून गेली तारापूर एमआयडीसी मधील कॅम्लिन कोकुयो लिमिटेडसह अनेक करखान्यात पाणी शिरून लाखो रुपयांच्या कच्च्या व पक्क्या मालाचे नुकसान झाले आहे. बोईसर - पालघर रस्त्यावरील सरावली रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अनेक ठिकाणी झाडे व वीजेचे खांब पडून वीज वाहक तारा कोसळल्या होत्या. रात्री पासून पहाटे पर्यंत सर्वत्र वीज गायब झाल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. बोईसरच्या सिडको वसाहतीतील शेकडो घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे तेथील हजारो नागरिक पहाटे पर्यंत घरातील मौल्यवान व धान्य तसेच इतर सामान वाचविण्याच्या प्रयत्नात होते.
मासेमारी नौकेचे नुकसानपाचूबंदर येथील प्रकाश गोरायकर यांच्या एलरोई या मासेमारी नौकेवर वीज पडली. त्यामुळे वायरलेस संच, जीपीएस, अॅटेना, डायनिमा, वायरिंग जळल्याने दोन लाखाचे नुकसान झाले.वसईतील मैत्री शाहचा लोकलमधून पडून मृत्यूवसईत राहणारी कॉलेज तरुणी मैत्री शाह (१७) हिचा लोकल ट्रेनमधून पडून मंगळवारी रात्री मृत्यु झाला. मैत्री घरी परतत असताना लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने दरवाजावर उभी होती. पण, गर्दीच्या रेट्याने बोरीवली ते दहिसर दरम्यान धावत्या लोकलमधून ती पडली.विजेच्या धक्क्याने प्रशांत शेट्टींचा मृत्यूपश्चिमेच्या ओम नगर येथे राहणाºया प्रशांत शेट्टी या इसमाचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. वीजेच्या खांबाला त्याने हात लावला. पावसामुळे त्यात करंट उतरला होता. त्याचा धक्का लागून त्याचा जागीत मृत्यू झाला.जाधव, राय यांचे मृतदेह सापडले, भोसले बेपत्तानालासोपारा पश्चिमेकडील देसाईवाडी येथे राहणा-या संदेश मनोहर जाधव याचा मृतदेह बुधवारी सकाळी नवाळे येथील तलावात आढळला. ते रात्री वाहून गेले होते. माणिकपूर येथील तलावात दोन जण अॅक्टीव्हासह बुडाले. अक्षय राय याचा मृतदेह सकाळी सापडला. तर राजेश भोसले याचा शोध अद्याप सुरु आहे.>जय इंदिरा ही बोट उडाली २५ फूट अन खडकावर आदळलीपालघर : माहीम-टेम्भी या किना-यावर नांगरून ठेवलेल्या बोटींचे दोरखंड बांधण्यासाठी गेलेल्या मच्छीमाराना चक्रीवादळाने २० ते २५ फूट फेकून दिले. त्यात एका बोटींचे दोन तुकडे होत एक मच्छीमाराला आपला जीव गमवावा लागला तर दोन लोक जखमी झाले. काल दुपार पासून जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरु वात झाल्यानंतर संध्याकाळी वादळी वारे वाहू लागले. त्यामुळे टेम्भी मच्छीमार सहकारी संस्थेचे सभासद असलेले काही मच्छीमार किना-यावर नांगरून ठेवलेल्या आपल्या बोटींतले दोरखंड, ताडपत्री घट्ट बांधणे, बोटीत साचलेले पाणी बाहेर फेकणे ह्या कामासाठी समुद्रात उतरले. रघुनाथ तुकाराम पाटील ह्यांची ‘जय इंदिरा’, हेमचंद्र यशवंत चौधरी ह्यांची भारती प्रसाद, अनंत आत्माराम तांडेल यांची दर्या दौलत, सखाराम नारायण पागधारे यांची साई प्रसाद, प्रकाश वासुदेव तांडेल यांची दर्या दौलत दिपक पद्माकर शिणवारी ह्यांची लक्ष्मी प्रसाद, या बोटीची कामे संध्याकाळी सुरू असताना वादळाला सुरु वात झाली. त्यामुळे घाबरून सर्वांनी बोटीचा आडोसा घेतला.परंतु बोटीही गदागदा हलू लागल्यानंतर सर्वांनी बोटीतून खाली उड्या घेतल्या. मात्र जय इंदिरा ही बोट वादळाच्या भोवºयात सापडून २० ते २५ फूट आकाशात उडाली आणि खडकावर आदळून त्या बोटींचे तुकडे झाले. या अपघातात ती बोट अंगावर आदळून झालेल्या अपघातात संदीप तांडेल हा ५२ वर्षीय मच्छीमार मृत्युमुखी पडला. ह्याच वेळी दीपक पद्माकर शनिवारी (वय ३५ वर्षे) व प्रकाश मंगल्या पटकर (५०) यांच्या डोक्याला, हाताला, पायाला मार बसून ते जखमी झाले आहेत.तर रघुनाथ पाटील, आत्माराम तांडेल,जयवंत तांडेल, हेमचंद्र चौधरी, हे मच्छीमार ह्या वादळतून सुदैवाने बचावले. या चक्री वादळाने केळव्याच्या बागेतील सुरुंची झाडे उन्मळून पडली. शिरगावच्या किनाºयावर धडकून नाविद ए एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू शाळेच्या इमारितची बहुतांवशी पत्रे उडून गेले.