शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील दालनाची तोडफोड; अज्ञात महिलेच्या कृत्याने खळबळ
2
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
3
अरुणाचल प्रदेशात भारतानं केलं मोठं काम, चीनला झोंबली मिर्ची; सुरू केला थयथयाट!
4
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन
5
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार
6
कर्नाटकात सीबीआयला प्रवेश बंद; राज्य सरकारने अधिसूचना घेतली मागे
7
डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
8
१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य
9
आमी जे तोमार! विद्या बालनची मंजुलिका रुहबाबाला पछाडणार? 'भूल भूलैय्या ३'चा भयानक टीझर रिलीज
10
"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान
11
IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)
12
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?
13
Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?
14
शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
15
Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."
16
स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी
17
"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...
18
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
19
IPL 2025 : शाहरुखच्या KKR नं खेळला मोठा डाव; MS धोनीच्या सहकाऱ्यानं घेतली गौतम गंभीरची जागा
20
'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."

पावसाळी रानभाज्या होताहेत दुर्मिळ

By admin | Published: July 07, 2015 10:26 PM

पावसाळा आला की, पूर्वी खेड्यापाड्यातच नव्हे तर शहरातही रोजच्या जेवणात रानभाज्यांची रेलचेल असायची. गरीब कुटुंबे पावसाळाभर या रानभाज्यावरच बहुधा अवलंबून असत.

कासा : पावसाळा आला की, पूर्वी खेड्यापाड्यातच नव्हे तर शहरातही रोजच्या जेवणात रानभाज्यांची रेलचेल असायची. गरीब कुटुंबे पावसाळाभर या रानभाज्यावरच बहुधा अवलंबून असत. मात्र ग्रामिण भागात वाढत्या बांधकामामुळे या रानभाज्या सध्या दुर्मिळ झाल्याचे चित्र असून रानावनात दिसणाऱ्या रानभाज्याही जंगलाच्या ऱ्हासामुळे आता दिसेनाशा झाल्या आहेत.पावसाळ्यात रानात झाडी झुडुपात शेवली, कोलीभाजी, अळू, कोरल, आफीम, घोळू, कुरडू, बाफळी, शेवगाचा पाला, माठभाजी आदी पालेभाज्या, कर्टूले, पेढरं, काकडं, टेटवी, शिंद (बांबु), अभईच्या शेंगा या फळभाज्या तर कंद, कडुकंद (वली), अळूचे कंद, करांदे, कणक, कसऱ्या आदी कंदभाज्या उगवतात. यापैकी बऱ्याच वनस्पती औषधी गुणधर्माच्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात त्या मानवी आरोग्यासाठी गुणकारी असतात. मात्र आता त्या दुर्मिळ होऊ लागल्याने खेड्या पाड्यातही त्याचा वापर आहारात कमीच झाला आहे.बांबुच्या झाडाच्या जमिनीलगत येणारे नवीन अंकुर भाजीत वापरले जात असून त्यास ग्रामीण भागात शिंद संबोधले जाते. बांबुना काप देवून ती तयार केली जाते. बाफळी ही पालेभाजी जंगलातील कपारीत एखाद्या ठिकाणीच आढळत असून ती गुणकारी आहे. त्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. तर टेटवी, करंटोळी, पेढरं, कुरडू हे झाडी झुडूपातही आढळतात. कडूकंदापासून वली बनवितात मात्र त्यातील कडवटपणा कमी करण्यासाठी त्या राखाडी टाकून धुवून घेतात. रानमाळावर उगवणारी आळींब या वनस्पतीला मोठ्या प्रमाणात मागणी असते मात्र रानभाज्या दिवसेंदिवस दुर्मिळ होत जात आहेत. (वार्ताहर)