लोकमत न्यून नेटवर्कवसई : राज्य सरकारने मासेमारील ३१ मे ते ३१ जुलैपर्यंत बंदी घातली असल्याने वसईच्या किनाऱ्यावर बोटी सुरक्षित स्थळी ठेवण्याचे काम मच्छिमारांनी सुरु केले आहे. पावसाळ््यात खोल समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घातली जाते. यंदा ही बंदी ३१ मेपासून सुरु होणार असून ३१ जुलैपर्यंत मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आपल्या बोटी किनाऱ्यावर सुरक्षित ठेवण्याच्या कामाला किनारपट्टीवरील अनेक गावांमधील मासेमारांनी सुरुवात केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील मच्छिमारांचे बंदीमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते. त्यासाठी त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक राजकुमार चोरघे यांनी केली आहे. दोन महिने मासेमारी बंद असल्याने मच्छिमारांना उपजिवीकेचे दुसरे कोणतेच साधन नसते. त्यामुळे त्यांना प्रसंगी व्याजाने पैसे घेऊन संसाराचा गाडा हाकावा लागतो. उत्पन्न बंद असल्याने कर्ज फेडताना त्यांची दमछाक होते. याच काळात मुलाबाळांच्या शिक्षणाला सुरुवात होत असते. त्याचवेळी त्यांच्याकडे पैसे नसल्याने शिक्षणावर परिणाम होत असतो. पुरेसे शिक्षण नसल्याने मच्छिमारांची मुले शिक्षणापासून वंचित राहिलेली दिसून येतात. त्यातच चुकीच्या धोरणामुळे मत्स्य संपदा दरवर्षी घटते आहे. महाराष्ट्राती बारा लाख मच्छिमार कुटुंंबांची ही व्यथा त्यांनी मुख्यमंत्र्यांना कळवली आहे. आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मच्छिमारांना किमान एक लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मच्छीमार बोटी किनाऱ्यावर आणण्याची धावपळ सुरू
By admin | Published: May 29, 2017 5:43 AM