साहेब, तुम्ही आलात म्हणून आज पाणी आले हो...

By admin | Published: July 30, 2016 04:35 AM2016-07-30T04:35:57+5:302016-07-30T04:35:57+5:30

तारापूर अणुऊर्जा केंद्र तीन व चारच्या उभारणीनंतर विस्थापीत झालेल्या अक्करपट्टी व पोफरण या दोन गावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केलेल्या गावामध्ये पिण्यासाठी ४ कोटी २० लाख

Saheb, you have come here as water ... | साहेब, तुम्ही आलात म्हणून आज पाणी आले हो...

साहेब, तुम्ही आलात म्हणून आज पाणी आले हो...

Next

बोईसर : तारापूर अणुऊर्जा केंद्र तीन व चारच्या उभारणीनंतर विस्थापीत झालेल्या अक्करपट्टी व पोफरण या दोन गावातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केलेल्या गावामध्ये पिण्यासाठी ४ कोटी २० लाख रुपये योजनेसाठी खर्चूनही पाण्याची स्थिती अतिशय गंभीर असून प्रकल्पग्रस्तांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी प्रकल्पग्रस्तांच्या पिण्याच्या पाण्याच्या स्थितीची पाहणी सूरू करण्यात आली असून सलग दोन दिवस ही पाहणी करण्यात येणार आहे.
पालघरचे उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट, महाराष्ट्र जीवनप्राधीकरण पालघरचे उपअभियंता एस.एन. कसबे, कार्यकारी अभियंता एम.जी. गीरगावकर, एम.आय.डी.सी.चे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता नंदकुमार करवा पालघरच्या तहसीलदार स्रेहल कतिचे, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व महसूल विभागाचे कर्मचारी तसेच पोफरणचे सरपंच रविंद्र मोरे, उपसरपंच सचिन ठाकूर, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे, विरेंद्र पाटील, विजय तामोरे, गणेश कोरे, अजित पाटील, शेखर तामोरे आणि प्रकल्पग्रस्त आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळपासून पाणी योजनेची संयुक्त पाहणीस सुरुवात करण्यात आली आहे. आज संपूर्ण दिवसात पोफरण तर उद्या अक्करपट्टीची तपासणी होणार आहे.
आज प्रथम पोफरण गावातील ७५००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी भरण्यात आली आणि त्यानंतर विभागानुसार पोणी सोडण्यात आले. त्या प्रत्येक झोनमध्ये उपविभागीय अधिकारी शिवाजी दावभट यांनी संपूर्ण तपासणी पथकासह व्यक्तीश: त्या भागातील बहुसंख्य घरात जाऊन पाण्याच्या स्थितीची पाहणी केली. त्यावेळी काही भागांमध्ये पाणी येत होते, काही ठिकाणी येत होते. परंतु पुरेसे पाणी येतच नव्हते.
दावभट यांच्यासमोर प्रकल्पग्रस्तांनी व्यथा मांडताना आमची सोन्यासारखी घरेदारे, जमीनी देऊन आम्हाला पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. सुषमा संदेश मोरे या महिलेने तर तीन वर्षांत आज प्रथम पाणी आल्याचे सांगितले. काहींनी अनेक दिवस पाण्याची प्रतिक्षा करावी लागते असे सांगितले तर काहींनी साहेब, आज तुम्ही आले आहात म्हणून पाणी आल्याची भावना व्यक्त केली. पाण्याच्या पाइप जराही उंचीवर नेला तर पाण्याचा दाब नसल्याने पाणी येत नसल्याचे प्रत्यक्ष दाखविले. अशा पाण्याबाबतच्या वेगवेगळ्या समस्या व चित्र पहावयास मिळाले. (वार्ताहर)

Web Title: Saheb, you have come here as water ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.